गड-ओंकार महाविद्यालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-ओंकार महाविद्यालय
गड-ओंकार महाविद्यालय

गड-ओंकार महाविद्यालय

sakal_logo
By

ओंकार महाविद्यालयात शिष्यवृत्तीवर कार्यशाळा
गडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालयात उच्च शिक्षणातील शिष्यवृत्तीच्या विविध योजना व प्रक्रिया विषयावर कार्यशाळा झाली. शिष्यवृत्ती विभाग व समान संधी कक्षातर्फे ही कार्यशाळा झाली. प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण अध्यक्षस्थानी होते. संचालक उध्दव इंगवले यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. वैभव शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. पहिल्या सत्रात महेश चौगुले (इचलकरंजी) यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक विद्यार्थ्याने शासनाच्या एका तरी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. दुसऱ्या सत्रात प्रा. सोमनाथ खानापुरे यांनी शिष्यवृत्तीबाबत राबविल्या जाणाऱ्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. प्रा. एस. एस. सरमगदूम यांनी स्वागत केले. डॉ. जी. टी. चोले यांनी प्रास्ताविक केले. विजय पाटील, डॉ. काशिनाथ तनंगे, प्रा. कविता पोळ यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. अश्विनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. मेघा बाळेशगोळ यांनी आभार मानले.