खर्च सादर न केल्याने ४४६ उमेदवार अपात्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खर्च सादर न केल्याने 
४४६ उमेदवार अपात्र
खर्च सादर न केल्याने ४४६ उमेदवार अपात्र

खर्च सादर न केल्याने ४४६ उमेदवार अपात्र

sakal_logo
By

खर्च सादर न केल्याने
४४६ उमेदवार अपात्र
कोल्‍हापूर, ता. १६ : गत ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत (२०१७) खर्चाचा हिशेब मुदतीत सादर न करणारे जिल्‍ह्यातील ४४६ उमेदवार अपात्र ठरले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये पाच वर्षांच्या कालावधीसाठी पंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा असा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. अपात्र उमेदवारांची यादी जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाहीर केल्याची माहिती उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी दिली.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम १४ (ब) (१) अन्वये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०१७ वर्षात हातकणंगले, राधानगरी, कागल, भुदरगड, शाहूवाडी, गडहिंग्लज, पन्हाळा व करवीर तालुक्यांतील एकूण ४४६ उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशेब मुदतीत सादर केलेला नाही. या उमेदवारांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये अपात्र ठरविण्यात आले. या उमेदवारांची माहिती शासन राजपत्रात २४ जानेवारी २०१९ ला प्रसिद्ध करण्यात आली आहे.