बाजार समिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजार समिती
बाजार समिती

बाजार समिती

sakal_logo
By

बाजार समिती.... लोगो...
.....

मतदार यादीसंदर्भात एक हरकत दाखल
बाजार समिती निवडणूक ः व्यापाऱ्याचे नाव वगळले
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सहकार विभागाकडून कच्ची मतदार यादी प्रसिद्धी केली. त्यावर हरकतीही मागविल्या आहेत. त्यानुसार व्यापारी गटातून फळविक्रेते निसार लतिफ यांचे नाव वगळले आहे.
दरम्यान, नियमानुसार आपल्याला मतदानाचा हक्क मिळावा, अशी मागणी करणारे निवेदन लतिफ यांनी दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली. त्यासाठी मतदान होणार आहे. त्या मतदारांच्या यादीत आपले नाव नाही. यात बाजार समितींचा व्यापारी परवाना घेऊन गेली दोन वर्षे चार महिने व्यापार करीत आहे. नियमानुसार ज्यांना परवाना घेऊन दोन वर्षे झाली आहेत, अशा परवानाधारक व्यापाऱ्याला बाजार समिती निवडणुकीत अधिकार मिळणे अपेक्षित आहे. असे असताना आपल्याला बाजार समिती मतदार यादीतून आपले नाव वगळले आहे. नियमानुसार मतदानाचा मला अधिकार मिळावा.
....

मतदार यादीवर पुन्हा आक्षेप
बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ग्रामपंचायत सदस्य मतदार आहेत. सध्याच्या ग्रामपंचायत सदस्यांची नावे बाजार समितीच्या मतदार यादीत आहेत, मात्र बाजार समितीच्या निवडणुकीपूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सध्याचे सदस्य बाजार समितीच्या निवडणुकीवेळी मतदार असतीलच, असे नाही. हा तांत्रिक पेच विचारात घेता बाजार समिती मतदाराच्या याद्या या ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच घ्याव्यात, या मुद्द्यावर न्यायालयात दाद मागितली जाणार आहे, अशी माहिती भगवान काटे यांनी दिली.