जनशक्तीतर्फे अन्न औषध प्रशासनाला निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनशक्तीतर्फे अन्न औषध प्रशासनाला निवेदन
जनशक्तीतर्फे अन्न औषध प्रशासनाला निवेदन

जनशक्तीतर्फे अन्न औषध प्रशासनाला निवेदन

sakal_logo
By

62801
कोल्हापूर : जनशक्तीतर्फे अन्न व औषध प्रशासनाला निवेदन देताना कार्यकर्ते.

अन्नभेसळ करणाऱ्यांवर कारवाईची
कोल्हापूर जनशक्तीतर्फे मागणी
कोल्हापूर, ता. १६ : दैनंदिन आहारातून मिळणाऱ्या अन्नपदार्थात मोठया प्रमाणात भेसळ, रासायनिक घटकांचा वापर वाढला आहे. यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायद्याची कडक अंमलबजावणी होत नाही, असे दिसते. सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणे हे प्रत्येक नागरिकाचा मुलभूत अधिकार आहे. यासाठी अन्नभेसळ करणाऱ्या घटकांवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन कोल्हापूर जनशक्तीतर्फे अन्न व औषध प्रशासनाला दिले. सहाय्यक आयुक्त (अन्न) मो. शं. केंबळकर यांना निवेदन दिले. निवेदनप्रसंगी समीर नदाफ, सुनील दमे, कमलाकर किलकिले, जमीर जमादार, ईश्‍वरप्रसाद तिवारी, बाळासाहेब शालबिद्रे, अनिल धडाम आदी उपस्थित होते.