आजरा हायस्कूलच्या विद्यार्थांची कलामहोत्सव स्पर्धेसाठी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा हायस्कूलच्या विद्यार्थांची कलामहोत्सव स्पर्धेसाठी निवड
आजरा हायस्कूलच्या विद्यार्थांची कलामहोत्सव स्पर्धेसाठी निवड

आजरा हायस्कूलच्या विद्यार्थांची कलामहोत्सव स्पर्धेसाठी निवड

sakal_logo
By

आजरा हायस्कूलच्या विद्यार्थांची
कलामहोत्सव स्पर्धेसाठी निवड
आजरा, ता. १७ ः येथील जनता एज्युकेशन सोसायटी आजरा संचलित आजरा हायस्कूल आजराच्या पाच विद्यार्थांच्या कलाउत्सव २०२२ या राज्यस्तरीय स्पर्धसाठी निवड झाली. नुकत्याच झालेल्या माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण विभागातर्फे घेतलेल्या जिल्हास्तरीय ऑनलाईन कलामहोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये लोकनृत्य, शास्त्रीय गायन, भूमिका अभिनय, द्विमितीय चित्रकला व त्रिमीतीय शिल्पकला या कलाप्रकारामध्ये सहभाग घेतला होता. या पाचही कलाप्रकारांची पुणे येथे होणाऱ्या ऑफलाईन कलामहोत्सवासाठी निवड झालेली आहे. यामध्ये लोकनृत्यकला प्रकारात आर्या कृष्णा पाटील, शास्त्रीय गायन साक्षी शेणवी, भूमिका अभिनय आर्यन कांबळे, द्विमितीय चित्रकला हर्षदा बापट व नीतेश राणे यांची निवड झाली. अजित तोडकर, व्ही. ए. पोतदार, पी. एम. पाटील, वाय. ए. शेटगे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक शिवाजी येसणे, उपमुख्याध्यापक बी. एम. दरी, पर्यवेक्षक एस. पी. होलम यांनी सहकार्य केले. संस्थेचे अध्यक्ष अशोक चराटी, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे, संचालक यांचे प्रोत्साहन लाभले.