आशा कर्मचारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आशा कर्मचारी
आशा कर्मचारी

आशा कर्मचारी

sakal_logo
By

62859

विविध मागण्यांबाबत ‘आशां’चे निवेदन
कोल्हापूर, ता. १६ ः ‘माता सुरक्षित घर सुरक्षित’ याचे मानधन मिळावे, आशांना रेकॉर्ड व औषधे ठेवण्यासाठी कपाट उपलब्ध करून देणे, एचबीएमसी व इतर फॉर्म द्या, या व इतर मागण्यांचे निवेदन आज आशा स्वयंसेविकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याकडे दिले. निवेदनातील मागण्या अशा, जिल्ह्यातील सर्व आशांचे व गटप्रवर्तकांचे एचबीवायसी प्रशिक्षण पूर्ण करून घ्यावे, आशांबरोबर प्रत्येक कार्यक्रमासाठी गटप्रवर्तकांनाही मानधनाची तरतूद करावी, गटप्रवर्तकांचा सॉफ्टवेअर भत्ता मागील फरकासह मिळावा, गटप्रवर्तकांचा आरोग्यवर्धिनीमध्ये समावेश करावा, कोविड लसीकरणाचे आशा व गटप्रवर्तक यांचे सत्राप्रमाणे भत्ता द्यावा, तसेच आभा कार्ड योजनेबाबत आशांना तांत्रिक जबाबदारी देऊ नये. दिवाळीपूर्वी आशांचे थकीत मानधन दिल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण व आरोग्य अधिकारी योगेश साळे यांचे आभार आशा स्वयंसेविकांनी मानले. यावेळी नेत्रदीपा पाटील, मंदाकिनी कोडक, शर्मिला काशीद, सुरया तेरदाळे, माया पाटील, पद्मा दुर्गळे, प्रिया सूर्यवंशी, लता केसरकर उपस्थित होत्या.