पालिकेने विद्युत खांबावरील बेकायदा केबल्स हटवल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेने विद्युत खांबावरील 
बेकायदा केबल्स हटवल्या
पालिकेने विद्युत खांबावरील बेकायदा केबल्स हटवल्या

पालिकेने विद्युत खांबावरील बेकायदा केबल्स हटवल्या

sakal_logo
By

62851
कोल्हापूर ः विद्युत खांबावरून टाकण्यात आलेल्या विविध केबल्स महापालिकेने हटवल्या. तावडे हॉटेल ते शिरोली जकात नाक्यापर्यंत आज झालेल्या कारवाईनंतर रिकामे झालेले विद्युत पोल.

विद्युत खांबावरील
केबल्स हटवल्या
पहिल्या टप्प्यात तावडे हॉटेल परिसरात कारवाई
कोल्हापूर, ता. १६ ः महापालिकेच्या विद्युत खांबांवरून बेकायदेशीरपणे टाकण्यात आलेल्या केबल्स महापालिकेच्या विद्युत विभागाने तोडण्यास सुरुवात केली. खांबांवरून सुरुवातीला एखाद्‌दुसरी दिसणाऱ्या या केबल्सनी गेल्या वर्षभरात संपूर्ण शहरच व्यापून टाकले. कोणत्याही नियमांच्या व्याख्येत न बसणाऱ्या या अस्ताव्यस्त केबल्सनी सारे शहर विद्रूप झाले आहे. शहराची सुरक्षा करणारी सीसीटीव्ही यंत्रणाही या अनधिकृत केबल्सच्या जाळ्यांनी प्रभावित झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर कारवाई करण्यात आली. यामुळे खांबांनी मोकळा श्‍वास घेतला.
इतर केबल्समुळे सीसीटीव्ही केबल ओळखताच येत नसल्याने मेंटेनन्सला अडथळा येत होता. शहरातील सीसीटीव्ही यंत्रणाही बंद पडल्याची स्थिती होती. बेकायदेशीर केबल्सबाबत कोणाचीही भीडभाड न घालता ही कारवाई करण्यात येत आहे. केबल चालकांकडून शहराला लाभणारे हे ओंगळवाणे स्वरूप बदलण्यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली. संपूर्ण शहरभर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. सदरच्या अनधिकृत केबल्स स्वतःहून उतरवून घेण्याबाबत वर्षभर महापालिका प्रशासन संबंधितांना आवाहन करीत होते. नोटीसही प्रसिद्ध केली होती. केबल चालकांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आज या कारवाईस प्रारंभ झाला.
आज तावडे हॉटेल ते शिरोली टोलनाका दरम्यानच्या विद्युत खांबांवरून सदरच्या बेकायदेशीर केबल्स हटविण्यात आल्याने हा परिसर केबल मुक्त झाला आहे. महापालिकेच्या विद्युत विभागाने केबल चालकांचे नुकसान होऊ नये म्हणून इतर ठिकाणच्या त्यांच्या अशा बेकायदेशीर पद्धतीने टाकलेल्या केबल्स स्वतःहून उतरवून घेण्याबाबत आवाहन केले आहे.
---------------
चौकट
...तर पालिकेला मिळेल महसूल
दरम्यान, सांगलीमध्ये अशा केबल्स रस्त्याच्या एका बाजूने स्वतंत्र पोल्सवरून नेण्यात आल्याचे सांगण्यात येते. अशा प्रकारच्या व्यवस्थेमुळे महापालिकेस महसूलही मिळेल. सदरच्या खांबांवर जाहिरातींचे छोटे बोर्डस (किऑस्क्स) बसवून त्यातून महसूल तर मिळवता येईलच; परंतु पद्धतशीरपणे केबल्सही बांधता येतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.