सर्वोदय खादी संघाचे मौन आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वोदय खादी संघाचे मौन आंदोलन
सर्वोदय खादी संघाचे मौन आंदोलन

सर्वोदय खादी संघाचे मौन आंदोलन

sakal_logo
By

सर्वोदय खादी संघाचे मौन आंदोलन
कोल्हापूर ः खादी ग्रामोद्योग व कोल्हापुरातील रचनात्मक काम करणाऱ्या संस्था, संघटनांमधील भ्रष्ट काराभाराची चौकशी होण्यासाठी सर्वोदय खादी संघातर्फे खादी संघासमोर मौन आंदोलन करण्यात आले. गुलाबराव घोरपडे, आबा कांबळे, फत्तेसिंह राजेमाने यांच्या हस्ते आचार्य विनोबा भावे यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. सर्वोदय कार्यालय खुले करा, भूदान ग्रामदानाची गायब झालेली संकल्प पत्रांची चौकशी करा, जवाहरनगर येथील चर्मकार जागेतील अतिक्रमणे हटवून जागा खुली करा, सर्वोदयच्या नावाने गोळा केलेल्या पैशांचा हिशेब द्या, या मागण्या केल्या. या वेळी ॲड. प्रमिला सावंत, ॲड. सारिका तोडकर, सम्राट बराले, भाऊ सुतार, अनिल जाधव, बाजीराव खोत, महेश सावंत उपस्थित होते.