मेन राजारामप्रश्‍‍नी मुख्यमंत्र्यांना इमेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेन राजारामप्रश्‍‍नी मुख्यमंत्र्यांना इमेल
मेन राजारामप्रश्‍‍नी मुख्यमंत्र्यांना इमेल

मेन राजारामप्रश्‍‍नी मुख्यमंत्र्यांना इमेल

sakal_logo
By

लोगो...

‘मेन राजाराम’प्रश्‍‍नी मुख्यमंत्र्यांना इ-मेल
---
माजी विद्यार्थी, नागरिकांचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १६ : ‘मेन राजाराम’चे स्‍थलांतर करू नये, यासाठी मुख्यमंत्र्यांना इ-मेल पाठविले जात आहेत. माजी विद्यार्थी संघटनेसह नागरिकांनीही या मोहिमेत सहभाग घेतला. ही मोहीम अधिक व्यापक केली जाणार आहे. जिल्‍ह्यातून एक लाख इमेल पाठवले जाणार आहेत. सोमवारनंतर शाळा, कॉलेजमध्ये जाऊन इ मेल करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ऐतिहासिक मेन राजाराम हायस्‍कूलचे स्‍थलांतर करण्याचे वक्‍तव्य पत्रकार परिषदेत केले होते. या त्यांच्या वक्‍तव्यानंतर महापालिकेने पर्यायी जागेचा शोध घेतला. या सर्व प्रकारावर नागरिकांच्या संतप्‍त प्रतिक्रिया उमटल्या. कोणत्याही परिस्‍थितीत हायस्‍कूलचे स्‍थलांतर न करण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला. यासाठी व्यापक सर्वपक्षीय व संघटनांची बैठक घेण्यात आली. यामध्ये सरकारला पंधरा दिवसांचा अल्‍टीमेटम देण्यात आला. शनिवारी (ता.१९) दिलेली मुदत संपत असल्याने आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

सर्वपक्षीय नागरिक कृती समितीची बैठक घेण्यापूर्वी मेन राजारामच्या माजी विद्यार्थ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मेन राजारामचे स्‍थलांतर रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना १ लाख इ मेल पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची सुरुवात बुधवारी झाली असून, दिवसभरात ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी व नागरिकांनी इ मेल केले आहेत. सोमवारपासून ही मोहीम अधिक व्यापक करण्यात येणार आहे. तसेच शनिवारपर्यंत शासनाने भूमिका जाहीर केली नाही, तर पुढील आंदोलनाची दिशाही शनिवारीच ठरवण्याबाबत बैठक घेतली जाणार आहे.
...