पानसरे स्मारकाला ५० लाखांचा निधी द्यावा. ः भाकप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पानसरे स्मारकाला ५० लाखांचा निधी द्यावा. ः भाकप
पानसरे स्मारकाला ५० लाखांचा निधी द्यावा. ः भाकप

पानसरे स्मारकाला ५० लाखांचा निधी द्यावा. ः भाकप

sakal_logo
By

62821
....


कॉ. पानसरे स्मारकासाठी ५० लाखांचा निधी द्या

भाकपची मागणी : महापालिका प्रशासकांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांची समाजकंटकांनी हत्या केली. पानसरे यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय महापालिका सभागृहाने घेतला असून, त्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे; मात्र सध्या निधी कमी पडत असून, आणखी ५० लाख निधी त्यासाठी द्यावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली. पक्षाच्या शिष्टमंडळाने आज महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
सतीशचंद्र कांबळे म्हणाले, ‘स्मारकाला कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार नाही, असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितलेले आहे. यापूर्वी स्मारकासाठी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी २० लाख रुपयांचा निधी दिलेला होता. आता उर्वरित काम व स्मारकाच्या देखभालीसाठी निधीची तरतूद करण्यासाठी सुमारे ५० लाख रुपयांचा निधीची आवश्यकता आहे. कॉ. गोविंद पानसरे यांना महानगरपालिकेने ‘कोल्हापूर भूषण’ हा पुरस्कार दिलेला आहे. तसेच ते कोल्हापूर महानगरपालिकेत नोकरीला होते. नंतर ते नगरसेवकही झाले. तसेच त्यांनी कोल्हापूरची प्रगती होण्यासाठी अनेक आंदोलनाच्या माध्यमातून भरीव कामगिरी केली आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेने याची जाणीव ठेवून आपले कर्तव्य म्हणून ५० लाख रुपयांचा निधी द्यावा.’
माजी नगरसेवक शारंगधर देशमुख म्हणाले, ‘महानगरपालिकेत आता प्रशासकीय बॉडी कार्यरत आहे. त्यामुळे त्यांनी ताबडतोब याबाबत निर्णय करावा. अन्यथा आम्ही कोणत्याही परिस्थितीत स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही.’
माजी नगरसेवक आदिल फरास म्हणाले, ‘मी स्वतः स्थायी समिती चेअरमन असताना स्मारकासाठी निधी मंजूर केलेला होता, पण प्रशासकीय कामामुळे त्याला विलंब झाला व निधी कमी पडत आहे. त्यामुळे याची जबाबदारी महानगरपालिकेने घ्यावी.’
यावेळी आमदार जयश्री जाधव, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, सिटी इंजिनिअर नेत्रदीप सरनोबत, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सतीशचंद्र कांबळे, शाहीर सदाशिव निकम उपस्थित होते.