तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी अर्ज करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी अर्ज करा
तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी अर्ज करा

तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी अर्ज करा

sakal_logo
By

‘तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी अर्ज करावेत’
कोल्हापूर, ता. १६ : जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांना ‘राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टल’बाबतची माहिती झाली पाहिजे. यासाठी अधिकाधिक पात्र तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळविण्यासाठी संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे सदस्य विशाल लोंढे यांनी केले आहे. राज्यातील तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने राज्य व विभागीय स्तरावर राज्यातील तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करण्यास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टल सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पात्र तृतीयपंथीयांनी तृतीयपंथीय व्यक्तींसाठी राष्ट्रीय पोर्टलवर भेट देऊन ‘ॲप्लाय ऑनलाइन’वर आपला युजर आयडी व पासवर्ड तयार करून आपली सर्व माहिती भरावी.