परिखपूल बैठक बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परिखपूल बैठक बातमी
परिखपूल बैठक बातमी

परिखपूल बैठक बातमी

sakal_logo
By

62896

परीख पुलाचे विस्तारीकरण
पाच महिन्यांत करा
---
आर्किटेक्ट ॲण्ड इंजिनिअर असोसिएशनची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः परीख पुलाचे विस्तारीकरण केल्यास पुढील पावसाळ्यापूर्वी पुलाचा विषय मार्गी लागू शकतो. कारण इथे सूचना, हरकती, युटिलिटी शिफ्टिंगसारख्या किचकट गोष्टी टाळता येणार आहेत. चार लेनची सुविधा उपलब्ध झाल्यास ट्रॅफिक, सेफ्टी या समस्यांचे निराकरण होईल. ट्रेंचलेस टेक्नॉलॉजीचा अवलंब करीत पुलाखाली येणाऱ्या पाण्याचा निचरा होईल. भुयारी किंवा उड्डाणपुलाच्या तुलनेत कमी कालावधीत कमी निधीत सदरच्या परीख पुलाचे नूतनीकरण होऊ शकते. जानेवारी ते मे या कालावधीत हे काम करावे, अशी मागणी इंजिनिअर्स ॲण्ड आर्किटेक्ट असोसिएशनने केली. यासाठी आज त्यांनी रेल्वेचे अधिकारी बृजेशकुमार सिंग यांची भेट घेतली.
फिरोज शेख यांनी आजपर्यंत पुलासाठी झालेल्या आंदोलनाची आणि मागणीची माहिती दिली. त्यानंतर विस्तारीकरणाच्या आराखड्याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी माहिती मांडली. पुलाचे विस्तारीकरण झाल्यास पावसाळ्यात पाणी साठणे, वाहतुकीची कोंडी या समस्या कायमच्या संपतील, तसेच ट्रेंचलेस टेक्नॉलॉजीचा अवलंब करत पुलाखाली येणाऱ्या पाण्याचा निचरा होईल. भुयारी किंवा उड्डाणपुलाच्या तुलनेत कमी कालावधीत कमी निधीमध्ये सदरच्या परीख पुलाचे नूतनीकरण राजकीय, प्रशासकीय इच्छाशक्तीने नागरिकांना सध्याच्या परीख पुलाच्या अनेक समस्यांतून मुक्ती मिळू शकेल, हा विश्वास यावेळी बृजेशकुमारांकडे शिष्टमंडळाने व्यक्त केला. याबाबत फोनवरून आमदार सतेज पाटील यांनीही यावेळी रेल्वे स्टेशन प्रबंधक विजयकुमार, असोसिएशनचे इंजिनिअर सुधीर हंजे, चेतन पाटील, संजय मोहिते, रेल्वे कमिटी सदस्य संजय पोवार, शिवनाथ बियानी, परीखपूल नूतनीकरण समिती सदस्य सुशील हंजे, महेश दिघे उपस्थित होते.
-------------------------------------------
२५ नोव्हेंबरला आंदोलन
परीख पुलाविषयी निर्णय व्हावा, यासाठी येत्या २५ नोव्हेंबर रोजी परीख पुलाच्या ठिकाणी होडी आंदोलन हे ट्रॅफिकला अडथळा न करणारे, शांततापूर्ण मार्गाने कोणाचाही निषेध न करणारे केवळ आत्मक्लेश स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे. असेही यावेळी जाहीर करण्यात आले.
------------------------