इचल ः अशोक स्वामी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल ः अशोक स्वामी निवड
इचल ः अशोक स्वामी निवड

इचल ः अशोक स्वामी निवड

sakal_logo
By

62978
....
वस्त्रोद्योग महासंघाच्या अध्यक्षपदी
अशोक स्वामी यांची फेरनिवड

इचलकरंजी, ता. १७ ः राज्यातील सहकारी सूतगिरण्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाच्या अध्यक्षपदी अशोक स्वामी यांची फेरनिवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश भागवत यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत सर्वानुमते ही निवड करण्यात आली.
दरम्यान, नुकतीच महासंघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. या नवनिर्वाचित संचालक मंडळामध्ये अशोक स्वामी, दिलीप मुथा, सुनील तोडकर, पृथ्वीराज देशमुख, रणजित देशमुख, बाबाराव पाटील, राजशेखर शिवदारे, राहुल महाडिक, किसनराव कुराडे, वीरेंद्र गजभिये, सविता सोनखेडकर (गायकवाड), रोहिणी खडसे-खेवलकर, अशोकराव माने, चंद्रकांत बडवे, विश्वनाथ मेटे यांचा समावेश आहे. या नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक संस्थेच्या बेलार्ड इस्टेट, मुंबई येथील कार्यालयात पार पडली. त्यामध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी स्वामी यांची फेरनिवड करण्यात आली.
------

अडचणी सोडविण्यासाठी
सातत्याने पाठपुरावा

अशोक स्वामी यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या काळात वस्त्रोद्योगासह सूतगिरण्यांना भेडसावणाऱ्या‍ समस्या, निर्माण होणाऱ्या‍ अडचणी यासंदर्भात शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करून सर्व प्रश्न सोडविण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना यशही आले. मागील अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी केलेल्या कामांमुळे राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या अध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.