दादांची गुगली....... अन आमदारांची बॅटिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दादांची गुगली....... अन आमदारांची बॅटिंग
दादांची गुगली....... अन आमदारांची बॅटिंग

दादांची गुगली....... अन आमदारांची बॅटिंग

sakal_logo
By

दादांची गुगली....... अन्‌ आमदारांची बॅटिंग
निमित्त वाढदिवसाचे; आजऱ्यात चर्चेला उधाण, कुणाची राजकीय इनिंग होणार यशस्वी?
रणजित कालेकर ः सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २० ः भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमाचे कवित्व आजरा तालुक्यात चांगलेच रंगले आहे. नव्या साठगाठीसाठी चालेल्या धडपडीमुळे थंडीच्या दिवसात राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी टाकलेली गुगली अन्‌ आमदार राजेश पाटील यांनी केलेली बॅटिंग यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे कुणाची राजकीय इनिंग यशस्वी होणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत. माजी मंत्री भरमू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात चंदगडचे आमदार राजेश पाटील व राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांची प्रमुख उपस्थितीमध्ये श्री. चराटी यांचा वाढदिवस साजरा झाला. नेतेमंडळींनी केलेल्या वक्तव्यांमुळे वाढदिवसाचा कार्यक्रम विशेष चर्चेत राहिला. श्री. चराटी यांना विधान परिषद किंवा महामंडळावर पाठवावे, असा सूर व्यक्त झाला.
श्री. देसाई यांनी चराटींशी चाळीस वर्षांहून अधिक काळ मैत्री असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर प्रकाश आबिटकर यांना मंत्रिपद मिळावे, यासाठी शुभेच्छा दिल्या. हाच धागा पकडत राजेश पाटील यांनी चराटींना माझा पाठिंबा राहील, असे सांगितले. शिष्य श्री. चराटी यांना राज्याच्या राजकारणात मोठे पद मिळाले तर मला आनंदच आहे, असे माजी मंत्री पाटील यांनी दुजोरा दिला. जयवंतराव शिंपी यांनी चराटी यांच्याशी झालेली युती हा काळाचा महिमा असल्याचे नमूद केले. अनेकदा चराटी यांच्याबरोबर राजकीय मतभेद असणारे आजरा कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, माजी सभापती अल्बर्ट डिसोझा यांनी स्तुतीची सुमने उधळली. व्यासपीठावर सुरू असलेल्या राजकीय टोलेबाजीचा आनंद उपस्थित कार्यकर्त्यांनी लुटला; पण आगामी काळात राजकीय अपरिहार्यता म्हणून नेते काय करणार, याचे ठोकताळे मात्र ते रंगवू लागले. आमदार पाटील यांनी चराटी, शिंपी व देसाई यांनी एक होऊन आपल्याला साथ द्यावी, असे केलेले सुतोवाच बरच काही सांगणारे आहे.
नुकत्याच झालेल्या गोड साखरेच्या निकालाची धुरळा खाली बसतो न बसतो तोच आजरा, चंदगड व गडहिंग्लज तालुक्यांतील नेतमंडळीच्या झालेल्या गळाभेटीतून व केलेली विधाने यातून नव्या राजकीय समीकरणाचे संकेत मिळत आहेत. यामुळे आगामी जिल्हा परिषद, आजरा साखर कारखाना व अन्य शिखर संस्थाच्या निवडणुकात काय घडणार याकडे लक्ष वेधले गेले आहे.