राज्यस्तरीय स्पर्धेत वैष्णवीला रौप्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यस्तरीय स्पर्धेत
वैष्णवीला रौप्य
राज्यस्तरीय स्पर्धेत वैष्णवीला रौप्य

राज्यस्तरीय स्पर्धेत वैष्णवीला रौप्य

sakal_logo
By

63016
वैष्णवी राजे

राज्यस्तरीय स्पर्धेत
वैष्णवीला रौप्य
कोल्हापूर, ता. १७ ः मुंबई येथे नुकत्याच झालेल्या ३७ व्या महाराष्ट्र स्टेट शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी विनायक राजे हिने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात ज्युनिअर गटात रौप्य पदक तर सब युथ गटात कास्यपदक पटकावले. ती येथील परफेक्ट शूटिंग अकॅडमीची खेळाडू आहे. तसेच तिने वरिष्ठ गटातही अंतिम स्पर्धेत पाचवे स्थान पटकावले. विशेष म्हणजे तिन्ही गटांमध्ये वैष्णवी अंतिम स्पर्धेत खेळली. सध्या तिची भोपाळ येथे होणाऱ्या ६५ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यासाठी तिला आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त सर्टिफाईड प्रशिक्षक युवराज चौगले यांचे मार्गदर्शन मिळाले. तिला अकॅडमीचे सचिव प्रा. डॉ. सुरेश चौगले, अध्यक्ष संजय भामटेकर व आई - वडिलांचे सहकार्य मिळाले.