डेंगी तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेंगी तपासणी
डेंगी तपासणी

डेंगी तपासणी

sakal_logo
By

63066
कोल्हापूर ः डेंगीच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ठिकठिकाणी सर्व्हे करण्यात येत आहे.

शिवाजी पेठेत
औषध फवारणी
डेंगीच्या पार्श्‍वभूमीवर ८२० घरांत सर्व्हे
कोल्हापूर, ता. १७ : शिवाजी पेठ परिसरात सापडलेल्या डेंगी रुग्णांमुळे महापालिकेच्या यंत्रणेने धूर, औषध फवारणी तसेच सर्व्हे सुरू केला आहे. गेल्या पंधरा दिवसात तिथे तापाचे दोन रुग्ण आढळले. तसेच शहरात इतर भागात ८२० घरांच्या तपासणीमध्ये ३४ कंटेनरमध्ये डास अळ्या सापडल्या.
शिवाजी पेठेत काही दिवसांपासून केलेल्या सर्व्हेमध्ये ५८ पैकी १० कंटेनरमध्ये डासअळ्या सापडल्या. त्यामुळे धूर व औषध फवारणी सुरू केली आहे. याशिवाय गुरुवारी कसबा बावडा, सम्राट नगर, राजोपाध्येनगर, दुधाळी, उत्तरेश्वर पेठ, शिवगंगा कॉलनी, नाळे कॉलनी, नवनाथ नगर, गणेश कॉलनी, सुर्वेनगर, जरगनगर, सुभाषनगर, राजेंद्रनगर, साळोखे पार्क, महालक्ष्मीनगर, कपूर वसाहत, कदमवाडी, तटाकडील तालीम, कोष्टी गल्ली या परिसरात केलेल्या सर्वेक्षणात ८२० घरांची तपासणी करण्यात आली. १४६१ पैकी ३४ कंटेनरमध्ये डासअळ्या सापडल्या. ५ तापाचे रुग्ण आढळून आले असून त्यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी देण्यात आले आहेत. परिसरामध्ये औषध व धूर फवारणी करण्यात आली. सर्वेक्षणासाठी येणा-या आरोग्य कर्मचा-यांना नागरीकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.