अवि पानसरे व्याख्यानमाला ९ डिसेंबरपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवि पानसरे व्याख्यानमाला ९ डिसेंबरपासून
अवि पानसरे व्याख्यानमाला ९ डिसेंबरपासून

अवि पानसरे व्याख्यानमाला ९ डिसेंबरपासून

sakal_logo
By

अवि पानसरे व्याख्यानमाला ९ डिसेंबरपासून
---
‘भारताच्या वाटचालीची दिशा चुकत आहे का?’ मध्यवर्ती विषय
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः श्रमिक प्रतिष्ठान आयोजित ‘अवि पानसरे व्याख्यानमाला’ ९ डिसेंबरपासून आयोजित केली आहे. यंदा ‘अमृतमहोत्सवी भारताच्या वाटचालीची दिशा चुकत आहे का?’ या मध्यवर्ती विषयावर अभ्यासू, विचारवंत वक्ते आपले विचार मांडणार आहेत. व्याख्यानमालेत सात विविध विषयांवर विचारमंथन होणार असून, १५ डिसेंबरपर्यंत ही व्याख्यानमाला चालेल, अशी माहिती विश्वस्त सदस्य डॉ. मेघा पानसरे यांनी पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिली आहे.
देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षातील या व्याख्यानमालेच्या निमित्ताने पुढील गोष्टींचा विचार केला जाईल. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या वाटचालीत विविध राजकीय- सामाजिक विचारप्रवाह अस्तित्वात होते. विविध जाती- जमाती, धर्म, प्रांत, भाषा आणि संस्कृती, त्यातील अंतर्गत संघर्ष असूनही एक राष्ट्र म्हणून परस्परांशी जोडून घेत एक प्रबळ वसाहतवादविरोधी भावना विकसित झालेली पाहिली. त्या प्रक्रियेत हळूहळू निश्चित झालेली भारताची कल्पना काय होती, स्वातंत्र्याच्या इतिहासाचे खरे शिल्पकार असलेले नेते व लढणारी जनता यांच्यासमोर स्वातंत्र्याचे कोणते चित्र होते, आणि ते प्रत्यक्षात का येऊ शकले नाही, याचा गंभीरपणे विचार या व्याख्यानमालेत केला जाणार आहे.
.....

व्याख्यानमाला अशी
विषय तारीख वक्ते
भारताची संकल्पना ९ डिसेंबर दत्ता देसाई, पुणे
भारतीय लोकशाहीची हुकूमशाहीकडे वाटचाल १० डिसेंबर राजू परुळेकर, मुंबई
भारताच्या आर्थिक विकासाची दिशा ११ डिसेंबर शमा दलवाई, मुंबई
सांस्कृतिक राजकारण १२ डिसेंबर संजय पवार, मुंबई
प्रसारमाध्यमे व धार्मिक विद्वेषाचे राजकारण १३ डिसेंबर अमेय तिरोडकर, पुणे
शिक्षणाचे खासगीकरण व भगवेकरण १४ डिसेंबर मिलिंद वाघ, नाशिक
प्रवाहाची दिशा बदलली पाहिजे १५ डिसेंबर अजित अभ्यंकर, पुणे