आजरा ः पोलीस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः पोलीस वृत्त
आजरा ः पोलीस वृत्त

आजरा ः पोलीस वृत्त

sakal_logo
By

आजऱ्यात बॅंकेतच चोरट्याचा
५० हजारांवर डल्ला
आजरा, ता. १७ ः येथील एका राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या शाखेत कर्ज भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचे ५० हजार रुपये चोरट्याने लंपास केले. भिकाजी दत्तू गुरव (रा. हाळोली, ता. आजरा) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. आज दुपारी एकला हा प्रकार घडला. आजरा पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. गुरव यांच्या पत्नीचे आजरा येथील राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या शाखेत कृषी कर्ज आहे. या कर्जाची परतफेड करण्यासाठी गुरव हे पैसे घेऊन बॅंकेत गेले होते. बॅंकेत गेल्यावर चोरट्याने पिशवी कापून ५० हजार रुपये पळविले. पोलिस हवालदार अशोक शेळके अधिक तपास करीत आहेत.