फुटबॉल फिव्हर कोल्हापूरमध्ये शिगेला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुटबॉल फिव्हर
कोल्हापूरमध्ये शिगेला
फुटबॉल फिव्हर कोल्हापूरमध्ये शिगेला

फुटबॉल फिव्हर कोल्हापूरमध्ये शिगेला

sakal_logo
By

६३०५३   
कोल्हापूर ः जगभराचे लक्ष लागून राहिलेल्या वर्ल्ड कप फुटबॉलसाठी कोल्हापूरकरही सज्ज झाले आहेत. मंगळवार पेठेतील गुलाब गल्लीत लक्ष वेधून घेणाऱ्या विविध देशांच्या पताका. (बी. डी. चेचर ः सकाळ छायाचित्रसेवा)

६३०५६
सायबर चौकाजवळील रस्त्यावर उभारलेले ख्रिस्तियाने रोनाल्डोचे कट आउट.


फुटबॉल फिव्हर
कोल्हापूरमध्ये शिगेला
----
वर्ल्डकपसाठी सजल्या गल्ल्‍या कटआउट, पताकांनी
सकाळ वृत्तसेवा  
कोल्हापूर, ता. १७ : कोल्हापूर म्हणजे ‘फुटबॉल पंढरी’ आहे. जगभराचे लक्ष लागून राहिलेल्या वर्ल्ड कप फुटबॉलला रविवार (ता. २०) पासून सुरुवात होईल. कतार येथील स्टेडियम किक-ऑफसाठी सज्ज आहे आणि इकडे कोल्हापुरातील फुटबॉल शौकिनांनी गल्लोगल्ली पताका व खेळाडूंचे पोस्टर लावून आपणही फुटबॉल सामन्यांसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. 
शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम अर्जेंटिना संघाचे पाठीराखे मानले जाते. त्याचप्रमाणे दिलबहार तालीम मंडळही पाठीराखा असल्याने तेथील परिसरात अर्जेंटिना संघाचे झेंडे आणि खेळाडूंची पोस्टर पाहायला मिळतात. पाटाकडील तालीम मंडळ परिसरात ब्राझील संघाचे पाठीराखे असल्याचे दाखवून देण्यात आले. मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दहा प्रमुख संघांच्या पताका गुलाब गल्लीत लावून वेगळे वातावरण निर्माण केले. मेस्सी आणि रोनाल्डो यांचा हा शेवटचा वर्ल्ड कप असण्याची शक्यता आहे. या दोन्ही सुपरस्टार खेळाडूंची छायाचित्रे आणि भलीमोठी कट आउट उभारली आहेत. पूर्ण गल्लीत पताका लावण्यासाठी ओंकार पाटील, अजिंक्य पाटील, अनिकेत दळवी, तुषार म्हसवेकर, संकल्प मांगुरे या खेळाडूंनी परिश्रम घेतले. सायबर महाविद्यालयाजवळ रस्त्यावरही स्टार ख्रिस्तियाने रोनाल्डोचे भव्य कट आउट उभारले आहे. शहरात छत्रपती शाहू स्टेडियममध्ये होणाऱ्या स्थानिक फुटबॉल सामन्यासाठी सुमारे २० ते २२ हजार फुटबॉल शौकीन हजेरी लावत असतात. ‘केएसए’कडे नोंदणीकृत संघात ३२ वरिष्ठ संघांबरोबर सुमारे ८५ ज्युनिअर- सबज्युनिअर मुला-मुलींचे संघ आहेत. या संघात सुमारे पाच हजार खेळाडू आहेत. शहर फुटबॉलमय करण्यासाठी या सर्वांचे प्रयत्न आहेत. वर्ल्ड कप फुटबॉलचे आतापर्यंतचे सर्व सामने युरोपियन देशांमध्ये झाले. कतारसारख्या उष्ण प्रदेशात प्रथमच सामने होत आहेत. तेथील आठ दिमाखदार स्टेडियमचे व्हिडिओ, छायाचित्रे सोशल मीडियावरून यापूर्वीच व्हायरल झाली आहेत. त्यामुळे वातावरण फुटबॉलमय होण्यात भर पडली. स्थानिक क्रीडा साहित्याच्या दुकानातूनही नामवंत खेळाडूचा जर्सी क्रमांक आणि नाव असलेले तसेच संघाचे टी-शर्ट विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. 

मधुरिमाराजे छत्रपती
(एआयएफएफ महिला समिती सदस्या,  अध्यक्ष : वेस्टर्न इंडिया फुटबॉल महिला समिती)

वर्ल्ड कप फुटबॉल थरार महिनाभर असणारच आहे. पण, २२ तारखेपासून खेलो इंडिया अंतर्गत १७ वर्षांखालील मुलींच्या लीगचे ३० सामने छत्रपती शाहू स्टेडियमवर खेळविले जातील. कोल्हापूर फुटबॉलमय होत आहे. परंतु, मैदानावरील सामन्यांना हजेरी लावून शौकिनांनी महिला खेळाडूंचा उत्साह वाढवावा.