ग्रामपंचायतींच्या निवडणूकांची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामपंचायतींच्या निवडणूकांची
ग्रामपंचायतींच्या निवडणूकांची

ग्रामपंचायतींच्या निवडणूकांची

sakal_logo
By

ग्रामपंचायत निवडणुकीची
आचारसंहिता आजपासून
येत्या २८ पासून अर्ज दाखल होणार
कोल्हापूर, ता. १७ : जिल्ह्यातील ४४६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. ठिकठिकाणच्या तहसीलदारांकडून उद्या (ता. १८) निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर संबंधित गावांना आचारसंहिता लागू होईल.
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे गावागावांतील वातावरण तापले आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजपसह शिवसेना उद्धव ठाकरे गट, शिंदे गटही निवडणूक लढवणार आहे. त्‍याची ईर्ष्या पाहायला मिळणार आहे. पॅनेल कोणाचे आणि कसे असावे, याचे नियोजन सुरू आहे. गावात पक्षांपेक्षा गटातंटांचीच निवडणूक असते. त्यानुसार ४४६ गावांमध्येही बांधणी सुरू आहे. उद्यापासून याला गती येणार आहे. ग्रामपंचायतींसाठी २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान अर्ज दाखल केले जातील. ५ डिसेंबरला अर्ज छाननी, ७ डिसेंबरला चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. १८ डिसेंबरला मतदान व २० डिसेबरला मतमोजणी आहे.