किरकोळ दुकान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किरकोळ दुकान
किरकोळ दुकान

किरकोळ दुकान

sakal_logo
By

६३०७७

शुभम फराडे
‘ई-बाईक’ चे मानकरी

कोल्हापूर किरकोळ दुकानदार असोशिएशनची खरेदी स्पर्धा

कोल्हापूर, ता. १७ ः येथील कोल्हापूर किरकोळ दुकानदार असोसिएशनच्यावतीने दिवाळीनिमित्त ‘दिवाळी लकी ड्रॉ’ स्पर्धेत शुभम फराडे (पार्वती ट्रेडर्स) हे ई-बाईकचे मानकरी ठरले. या स्पर्धेत दुसरे बक्षीस सोमनाथ मोहिते (आंबेकर ऑईल डेपो) यांना तर तिसरे बक्षीस सौ. शीतल गोळे यांना मिळाले. येथील महाराराणी ताराराणी हॉलमध्ये ही सोडत काढली. यावेळी ‘कॅट’चे व्हाईस प्रेसिडेंड धैर्यशील पाटील, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, चितळे समूहाचे गिरीश चितळे, सचिन निवंगुणे, अजित कोठारी यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली आहे. यावेळी मोठ्या संख्येने किरकोळ दुकानदार उपस्थित होते. कार्यक्रमात असोसिएशनचे अध्यक्ष सदीप वीर यांनी योजनेची माहिती सांगितली. यावेळी अमोल कापसे, सल्लागार बबन महाजन, समीर कुलकर्णी, उमेश वालावलकर, मनोज मेढे, संभाजी जोग, विशाल माळी उपस्थित होते.