कोल्हापूरचा बालगोपाल संघ अरिहंत चषकाचा मानकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूरचा बालगोपाल संघ अरिहंत चषकाचा मानकरी
कोल्हापूरचा बालगोपाल संघ अरिहंत चषकाचा मानकरी

कोल्हापूरचा बालगोपाल संघ अरिहंत चषकाचा मानकरी

sakal_logo
By

63048
निपाणी : येथे झालेल्या फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या बाल गोपाल फुटबॉल संघाला एक लाख रुपयांचे बक्षीस आणि चषक देताना उत्तम पाटील. शेजारी आमदार प्रा. सुभाष जोशी, पृथ्वीराज पाटील, नगरसेवक विलास गाडीवड्डर, धनंजय मानवी आदी.

बालगोपाल अरिहंत चषकाचा मानकरी
निपाणीतील फुटबॉल स्पर्धेत पटकावले लाखाचे बक्षीस
निपाणी, ता. १७ : बोरगाव येथील युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील वाढदिवसानिमित्त निपाणी फुटबॉल अकॅडमीच्या सहकार्याने झालेल्या अरिहंत चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोल्हापूरच्या बालगोपाल तालीम संघाने पटकाविले. त्यांनी अंतिम सामन्यात सिल्वासा युनायटेडचा ४-० असा पराभव केला. बालगोपाल संघाला रोख एक लाख रुपये व चषकाने सन्मानित करण्यात आले. सिल्वासाला ७५ हजारांचे बक्षीस देण्यात आले.
बालगोपालचे राहुल पाटील व परमजीत सिंग यांनी चांगला खेळ केला. विजयानंतर कोल्हापूर संघाने जल्लोष केला. बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, नगरसेवक विलास गाडीवड्डर, धनंजय मानवी आदींच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. दरम्यान, उपांत्य फेरीत सकाळी दिव दमण संघाने बेळगाव ब्रदर्सचा पेनल्टी शूटआऊटवर ५-४ अशा फरकाने पराभव केला. दुसऱ्या सामन्यात बाल गोपालने गडहिंग्लज केबीआरवर १-० अशी मात केली.