शेती पंपाच्या वीज बिल दुरुस्तीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेती पंपाच्या वीज बिल दुरुस्तीची मागणी
शेती पंपाच्या वीज बिल दुरुस्तीची मागणी

शेती पंपाच्या वीज बिल दुरुस्तीची मागणी

sakal_logo
By

63116
---------
शेती पंपाच्या वीज बिल दुरुस्तीची मागणी
इचलकरंजी, ता. १८ : महावितरणकडून अनेक महिन्यांपासून शेतीपंपाचे सरासरी वीज बिल आकारणी होत असून ती वाढीव व अन्यायकारक आहे. अगोदरच महापूर, अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे, त्यात पिकांचे नुकसान झालेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाईही मिळाली नसून शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे शेती पंपाचे वाढीव वीज बिल दुरुस्त करून व्याज माफ करावे या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांतर्फे महावितरण अतिरिक्त कार्यकारी अभियंता राहुल पाटील यांना दिले.
निवेदनात शेती पंपाचे वीज बिल वेळेत न भरल्याने शेतकऱ्यांना वीज बिलावर व्याज आकारणी होत आहे. शेती पंपाचे सरासरी वीज बिल दुरुस्त करून वीज बिलावरचे व्याज माफ करावे. मीटर रीडिंगप्रमाणे वीज बिल आकारणी करावी, अशी मागणी केली आहे. अभिषेक पाटील, आण्णासाहेब शहापूरे, बसगोंडा बिरादार, अजिंक्य दरिबे, भाऊसो रुगे, महावीर बेडक्याळे, राजू वाघमोरे आदी उपस्थित होते.