श्रमुदतर्फे बुधवारी मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रमुदतर्फे बुधवारी मोर्चा
श्रमुदतर्फे बुधवारी मोर्चा

श्रमुदतर्फे बुधवारी मोर्चा

sakal_logo
By

श्रमुदतर्फे बुधवारी मोर्चा
प्रकल्पग्रस्तांना उद्ध्वस्त करणारे निर्णय रद्द करण्याची मागणी
दानोळी, ता. १८ ः प्रकल्पग्रस्तांना लाभक्षेत्रात दिलेल्या जमिनीची कब्जेहक्काची रक्कम भरण्याबाबतच्या निर्णयाविरोधात श्रमिक मुक्ती दलातर्फे कोल्हापूर, सांगली व सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी (ता. २३) मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे नजीर चौगुले यांनी दिली.
शासनाने प्रकल्पग्रस्तांना लाभक्षेत्रात दिलेल्या जमिनीची कब्जेहक्काची रक्कम भरण्याबाबतचा १४ ऑक्टोबर २०२१ चा काढलेला शासन निर्णय प्रकल्पग्रस्तांना उद्‍ध्वस्त करणारा आहे. तो तातडीने रद्द झाला पाहिजे. याबरोबरच प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन वाटप करताना प्राधान्यक्रम ठरवण्याबाबत १४ जून २०२२ रोजी झालेला हा शासन निर्णय रद्द झाला पाहिजे. यांसह अनेक धोरणात्मक व स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर व कार्याध्यक्ष संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.