खड्यांबाबत अभियंत्यांना जबाबदार धरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खड्यांबाबत अभियंत्यांना जबाबदार धरा
खड्यांबाबत अभियंत्यांना जबाबदार धरा

खड्यांबाबत अभियंत्यांना जबाबदार धरा

sakal_logo
By

63159
--------------
खड्ड्यांबाबत अभियंत्यांना जबाबदार धरा
इचलकरंजी नागरिक मंचतर्फे उपायुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी
इचलकरंजी, ता. १८ : शहरात विविध भागात पडलेल्या खड्ड्यांची माहिती द्यावी. दहा वर्षांत नवीन रस्ते बांधणी व दुरुस्ती, पॅचवर्क यासाठी झालेल्या खर्चाची माहिती जाहीर करावी. निकृष्ट कामकाज करणाऱ्या मक्तेदारांवर काय कार्यवाही केलेली आहे, याचा खुलासा करावा. तसेच शहर खड्डेमय करण्यास अप्रत्यक्ष कारणीभूत असणाऱ्या अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करावी. या मागणीचे निवेदन इचलकरंजी नागरिक मंचतर्फे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांना दिले.
शहरातील मार्गांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे समजण्यास मार्ग नाही. इचलकरंजी शहरात महापालिकेचे अभियंते विविध भागासाठी नियुक्त केलेले आहेत. भागात रस्त्याची कामे दर्जेदार होण्यासाठी महत्त्‍वाची जबाबदारी त्यांची असते. मात्र डिफेक्ट लायबिलिटी पिरेडनुसार कारवाई करण्याची जबाबदारीही त्यांची असून मक्तेदारांचे चुकीचे काम पाठीशी घातल्याने आज शहराची अवस्था खड्डेमय झाली आहे. त्यामुळे मार्गावरील खड्यांबाबत अभियंत्यांना जबाबदार धरावे, असे निवेदनात नमूद केले आहे.
दरम्यान, उपायुक्त ठेंगल यांनी १०७ कोटींमधील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याचे काम सुरू असून इतर खड्ड्यांबाबतही पॅचवर्क काम सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात राजू कोन्नूर, अमित बियाणी, राजू आरगे, अमोल ढवळे, दीपक अग्रवाल, सुहास पाटील, दीपक पंडित, महेंद्र जाधव, सुनील बारवाडे, धोंडिबा कुंभार, जतीन पोतदार, मनोहर जोशी उपस्थित होते.