इचल : प्रकाश आवाडे प्रेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : प्रकाश आवाडे प्रेस
इचल : प्रकाश आवाडे प्रेस

इचल : प्रकाश आवाडे प्रेस

sakal_logo
By

आमदार आवाडे फोटो
...

चर्चेने व समन्वयातून
सुळकूड योजना मार्गी लावू
---
आमदार प्रकाश आवाडे यांची माहिती
इचलकरंजी, ता. १८ ः दूधगंगा अर्थात सुळकूड योजना मार्गी लावण्यासाठी इर्ष्या केली जाणार नसून, चर्चेने व समन्वयातून मार्ग काढला जाणार आहे. याबाबत निर्माण झालेला गैरसमज दूर केला जाईल. सर्वांच्या सहमतीने या योजनेला गती दिली जाईल, अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.
आमदार आवाडे म्हणाले, की शहरवासीयांच्या पाण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला जाणार आहे. त्यासाठी शहराला सध्या पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या कृष्णा योजनेची उर्वरित सहा किलोमीटरची जलवाहिनी बदलण्यात येईल. २३ कोटी ७८ लाखांचा हा प्रस्ताव अद्याप शासनाकडे पोचला नाही. सध्या हा प्रस्ताव पुणे येथे आहे. यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे. पुढील पंधरा दिवसांत हा प्रस्ताव मुंबईत येईल. त्यानंतर या योजनेसाठी निधी मंजूर केला जाईल. हे काम पूर्णत्वास गेल्यावर तसेच १०० शुद्धपेय जल प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास शहरवासीयांना रोज पाणी मिळणार आहे.
ते म्हणाले, की शहरासाठी कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही योजना सध्या सुरू आहेत. पण, भविष्याचा विचार करता दूधगंगा योजना ही महत्त्वाची असेल. याबाबत विरोध असणाऱ्या मंडळींशी चर्चा केली आहे. त्यांचे गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांचे पाणी आपण काढून घेणार नाही. आपले हक्काचे दोन टीएमसी पाणी धरणात राखीव आहे. उलट त्यांना नदीवर बंधारा बांधून दिला जाईल. त्यांनी आंदोलन केले म्हणून आम्ही इर्ष्या करणार नाही. सामोपचाराने त्यांचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडविले जातील. समन्वयातून मार्ग काढून इचलकरंजी शहरासाठी दूधगंगा नदीतूनच पाणी आणले जाईल.
या वेळी प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, अहमद मुजावर, दीपक सुर्वे, राजू बोंद्रे, एम. के. कांबळे, राजाराम धारवट, अरुण आवळे, संजय केंगार, शंकर येसाटे, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.