शिवाजी विद्यापीठ गौरव गीताचे लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी विद्यापीठ गौरव गीताचे लोकार्पण
शिवाजी विद्यापीठ गौरव गीताचे लोकार्पण

शिवाजी विद्यापीठ गौरव गीताचे लोकार्पण

sakal_logo
By

63243
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय डी. सावंत यांच्या हस्ते विद्यापीठातील गुणवंत शिक्षक पुरस्कार स्वीकारताना डॉ. प्रकाश शंकर कांबळे. शेजारी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. त्यानंतर विविध पुरस्कार स्वीकारताना अनुक्रमे डॉ. उत्तम सकट, धैर्यशील यादव, सदानंद लोखंडे, बाळू नलवडे, डॉ. शिवाजी भोसले, चेतन पाटोळे, दत्तात्रय खराडे, डॉ. आण्णा काका पाटील, डॉ. उषा पाटील.

गौरवगीताचे लोकार्पण अन् कर्तृत्‍ववंतांचा गौरव
शिवाजी विद्यापीठाच्या वर्धापनदिनी सजला कौतुक सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : शिवाजी विद्यापीठाच्या साठाव्या वर्धापन दिन सोहळ्यात आज ‘विद्यापीठ आपुले जगी गर्जू दे...’ या विद्यापीठ गौरवगीताचे लोकार्पण झाले. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात गीताचे स्वागत केले. सर्वांनी या गीताप्रती आदरभाव व्यक्त करताना उभे राहून सामूहिक गायन केले.
दरम्यान, गीताचे गीतकार प्रा. गोविंद काजरेकर व प्रा. प्रवीण बांदेकर व संगीतकार अमित साळोखे यांच्यासह गायक कलाकारांचा सत्कारही झाला.
विद्यापीठातील गुणवंत शिक्षकाचा पुरस्कार अर्थशास्त्र अधिविभागातील डॉ. प्रकाश कांबळे यांना देण्यात आला. बॅ. पी. जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार डॉ. आण्णा काका पाटील (कराड) यांना, तर कै. प्राचार्य सुमतीबाई पांडुरंग पाटील आदर्श शिक्षिका पुरस्कार डॉ. उषा पाटील (कोल्हापूर) यांना प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर ‘नॅक’चे ‘अ+’ मानांकन मिळविणाऱ्या देवचंद महाविद्यालय, अर्जुननगर, राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इस्लामपूर व आर्टस्‌ अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे आणि ‘अ’ मानांकन मिळविणाऱ्या जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, उरुण-इस्लामपूर, गव्हर्न्मेंमेंट कॉलेज ऑफ फार्मसी, कराड, यशवंतराव चव्हाण कॉलेज, हलकर्णी, मालती वसंतदादा पाटील कन्या कॉलेज, उरुण-इस्लामपूर आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, सातारा या संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा सत्कार करण्यात आला.
-------------
चौकट
नॅनोसायन्स व ग्रंथालयशास्त्र उत्कृष्ट अधिविभाग
शिवाजी विद्यापीठाने सन २०१९ पासून उत्कृष्ट अधिविभाग पुरस्कार देण्यास सुरुवात केली. विज्ञान व तंत्रज्ञान आणि सामाजिक शास्त्रे असे दोन गट करून अधिविभागांचे सर्वंकष काटेकोर मूल्यमापन करण्यात येऊन हा पुरस्कार देण्यात येतो. संबंधित विभागाला पारितोषिकापोटी दहा लाख रुपये, प्रमाणपत्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा प्रदान करण्यात येतो. यंदा उत्कृष्ट अधिविभागांसाठीचा पुरस्कार स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभाग यांना देण्यात आला.
---------------
यांचाही झाला गौरव
डॉ. उत्तम सकट (सहायक कुलसचिव, लेखा विभाग), धैर्यशील यादव (वरिष्ठ सहायक, पगारपत्रके विभाग), सदानंद लोखंडे (वाहनचालक), बाळू नलवडे (हावलदार) यांच्यासह संलग्न महाविद्यालयांतील गुणवंत प्राचार्य डॉ. प्रवीण चौगुले (डी. आर. माने महाविद्यालय, कागल), संलग्न महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक डॉ. शिवाजी भोसले (सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, कराड), महाविद्यालयीन गुणवंत सेवक चेतन पाटोळे (प्रयोगशाळा सहायक, न्यू कॉलेज) दत्तात्रय खराडे (ग्रंथालय परिचर, प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर जि. सातारा) यांचाही कार्यक्रमात गौरव झाला.