न्यू कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्यू कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद
न्यू कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद

न्यू कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद

sakal_logo
By

फोटो 63213

राजर्षींचे योगदान जगभर पोचविण्याची जबाबदारी
---
प्रा. डॉ. हरी नरके; न्यू कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे समाजक्रांतिकारी योगदान जगभर पोचविण्याची जबाबदारी आजच्या अभ्यासक, विचारवंत आणि संशोधकांनी पार पाडावी, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासन केंद्राचे संचालक प्रा. डॉ. हरी नरके यांनी केले. न्यू कॉलेजमध्ये आजपासून राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त आयोजित दोनदिवसीय ‘राजर्षी शाहू छत्रपती ः दृष्टिकोन, योगदान व समकालीन प्रस्तुतता’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्‍घाटन झाले. या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार अध्यक्षस्थानी होते.
डॉ. नरके म्हणाले, की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर राजर्षी शाहू महाराजांचे प्रागतिक कार्य, त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्यांनी बजावलेली कृतिशील, आधुनिक, नवमतवादी भूमिका ही पुरोगामी महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे. समाजातील उपेक्षित, वंचित, मागास, अस्पृश्य बहुजन घटकांच्या कल्याणासाठी सदैव उपयुक्त ठरणारी आहे.
डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, ‘‘कोल्हापूर ही बहुजन समाजाची कर्मभूमी आहे. राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूरचे ब्रँड आहेत. त्यांच्या पुरोगामी कार्यामुळे करवीरनगरीला ओळख मिळाली.’’ परिषदेच्या प्रारंभी शाहीर आझाद नायकवडी यांनी शाहिरी पोवाड्याचे सादरीकरण केले. या परिषदेत देश-विदेशातून आलेल्या २०० हून अधिक संशोधकांनी सहभाग घेतला असून, विविध भाषांतील निवडक ८० शोधनिबंधांचे नवज्योत या संशोधन पत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एम. ए. नायकवडी व प्रा. अभिषेक श्रीराम यांनी सूत्रसंचालन केले. आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समन्वयक डॉ. अर्चना कांबळे यांनी आभार मानले.
या वेळी हुतात्मा उद्योगसमूहाचे (वाळवा) प्रमुख वैभव नायकवडी, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसचे चेअरमन के. जी. पाटील, उपाध्यक्ष डी. जी. किल्लेदार, संचालक विनय पाटील, डॉ. पी. के. पाटील, वाय. एल. खाडे, आर. डी. पाटील, सी. आर. गोडसे, सविता पाटील, सई खराडे, इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव, प्रा. डी. यू. पवार, वसंतराव मुळीक आदी उपस्थित होते.