१०६ मोबाईल संच मालकांना परत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१०६ मोबाईल संच मालकांना परत
१०६ मोबाईल संच मालकांना परत

१०६ मोबाईल संच मालकांना परत

sakal_logo
By

फोटो -
....

मोबाईल संच १०६ मूळ मालकांना परत

पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : जिल्ह्यातील गहाळ झालेल्या सुमारे १५ लाख ९० हजार रुपये किमतीच्या १०६ मोबाईल संचांचा शोध घेऊन ते मूळ मालकांना परत देण्यात आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
जून २०२२ ते ऑगस्ट २०२२ दरम्यान २६ लाख रुपये किमतीचे २६७ मोबाईल संच मोबाईलधारकांना परत दिले असून, गेल्या पाच महिन्यांत ४१ लाख ९० हजार रुपये किमतीचे संच परत करण्यात कोल्हापूर सायबर पोलिसांना यश आले आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मूळ मोबाईल मालकांना मोबाईल संच देण्यात आले.
बलकवडे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील काही नागरिकांचे २०१९ पासून मोबाईल संच गहाळ झाले होते. गहाळ व चोरीच्या गुन्ह्यातील संचची सायबर पोलिस ठाण्यांतर्फे तांत्रिक तपासाच्या आधारे शोध मोहीम राबवली. त्यासाठी पथके नेमण्यात आली. या पथकांनी एक महिन्यांत तांत्रिक तपास करून कर्नाटकातून ५२ व व महाराष्ट्रातून ५४ संच शोधून काढले. ज्या लोकांचे संच मिळून आले, त्यांच्याकडील कागदपत्रांची ओळख पटवण्यात आली.’’
पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सायबर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक कोमल पाटील, कॉन्स्टेबल अमर वासुदेव, सागर माळवे, रवींद्र पाटील, प्रदीप पावरा, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील असिफ कलयगार, सुरेश पाटील यांची वेगवेगळी पथके तयार केली होती. या मोहिमेत कॉन्स्टेबल महादेव गुरव, सचिन बेंडखळे, अजय सावंत, विनायक बाबर, सुरेश राठोड, सुधीर पाटील, दिलीप पोवार, रवींद्र गाडेकर, विशाल पाटील, सुहास पाटील, संगीता खोत, पूनम पाटील, रेणुका जाधव यांचा समावेश होता.’
----------

चौकट
मोबाईल चोरट्यांची कर्नाटकात टोळी....
मोबाईल चोरट्यांची कर्नाटकात एक टोळी आहे. सांगलीतील काही जणांचा चोरट्यांत समावेश आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे. चोरीच्या गुन्ह्यात रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांचा समावेश आहे. मोबाईल संच शोधण्यात कोल्हापूर युनिटची २०२१ मधील रिकव्हरी २४ टक्के होती. आता कोल्हापूर युनिटकडून झालेली ही कारवाई राज्यात मोठी आहे, असे बलकवडे यांनी स्पष्ट केले.
-----------------
चौकट

पोलिसांना पंचवीस हजार रुपये बक्षीस

मोबाईल संच गहाळ झाल्यानंतर तो मिळेल, अशी संबंधितांना खात्री नसते. मात्र, ते मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. या शोध मोहिमेत चांगले काम करणाऱ्या सायबरच्या पोलिसांना पंचवीस हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे, असेही बलकवडे यांनी सांगितले.