देसाई यांच्या वाढदिनी विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देसाई यांच्या वाढदिनी विविध कार्यक्रम
देसाई यांच्या वाढदिनी विविध कार्यक्रम

देसाई यांच्या वाढदिनी विविध कार्यक्रम

sakal_logo
By

63206
-------------
देसाई यांच्या वाढदिनी विविध कार्यक्रम
आजरा, ता. १८ ः येथील जनता सहकारी बॅंकेचे अध्यक्ष उदयसिंह ऊर्फ मुकुंदराव देसाई यांचा उद्या (ता. १९) वाढदिवस आहे. त्यानिमित्त शहरात विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
सुसंस्कृत, सत्त्वशील व संयमी नेतृत्व म्हणून त्यांची आजऱ्यासह जिल्ह्यात ओळख आहे. सहकाराबरोबर त्यांनी विविध क्षेत्रात ठसा उमटवला आहे. आजरा तालुक्याचे लोकनेते (कै) बळीराम देसाई हे मुकुंदरांवाचे वडील. कार्यकर्त्यांना बळ देणारा, जनसामान्यांचे दुःख दूर करणारा नेता म्हणून बळीराम देसाई यांची ओळख होती. आता त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मुकुंदराव सर्वच क्षेत्रात कार्यरत झाले आहेत. वडिलांच्या पश्चात जिल्हा बॅंकेमध्ये विभागीय अधिकारी असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. विधानसभेचे माजी सभापती (कै) बाबासाहेब कुपेकर, माजी मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील यांनी मुकुंदराव देसाई यांच्यावर विश्वास टाकून आजरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा मुकुंदरावांच्या खांद्यावर दिली. मुकुंदरावांनी वेगळ्या कार्यशैलीने दिलेली जबाबदारी ताकदीने पेलून विश्वास सार्थ ठरवला. जनता बॅंकेला ऊर्जितावस्था देत त्यांनी स्थैर्य मिळवून दिले. आज बॅंकेने गरूड झेप घेतली आहे. बॅंकेला राज्य व देशपातळीवरचे विविध पुरस्कार मिळाले आहेत.
ते आजरा कारखान्याचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. कोणालाही न दुखवता सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची कला त्यांना चांगलीच अवगत आहे. यामुळेच कार्यकर्ते, नेतेमंडळी यांच्याबरोबर विरोधकही त्यांना मानसन्मान देतात. पर्यावरण संवर्धनाबाबत देसाई यांची भूमिका स्पष्ट आहे.