शहरातील विविध भागात कमी दाबाने पाणीपुरवठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरातील विविध भागात
कमी दाबाने पाणीपुरवठा
शहरातील विविध भागात कमी दाबाने पाणीपुरवठा

शहरातील विविध भागात कमी दाबाने पाणीपुरवठा

sakal_logo
By

शहरातील विविध भागांत
कमी दाबाने पाणीपुरवठा
कोल्हापूर, ता. १८ ः भोगावती नदीतील पाणी पातळी खालावल्याने पाणी उपसा कमी झाला. परिणामी आज शहरातील विविध भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. काही उंचावरील भागात पाणीच आले नसल्याने नागरिकांची धावपळ उडाली.
तीन दिवसांपासून शहरात कमी दाबाने पाणी येत आहे. काही भागात केव्हा सकाळच्या सत्रातील, तर काही भागात संध्याकाळच्या सत्रातील पाणी आलेच नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागली. पाटबंधारे विभागाला पाणी सोडण्याबाबत पत्र दिले असल्याने आज पाणीपातळी वाढेल, असा अंदाज पाणीपुरवठा विभागाचा होता; पण दिवसभरात अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. काही ठिकाणी पाणीच आले नसल्याने शिल्लक पाण्याचा वापर करावा लागला. काही ठिकाणी टॅंकरमधून पाणी मागवावे लागले. उद्याही अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.