नो शेव्ह नोव्हेंबर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नो शेव्ह नोव्हेंबर
नो शेव्ह नोव्हेंबर

नो शेव्ह नोव्हेंबर

sakal_logo
By

63097

‘नो शेव्ह’मधून तरुणांकडून
सामाजिक बांधिलकी
कॅन्सरग्रस्तांबरोबरच गरजूंनाही मदतीचा हात
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : गेल्या पाच वर्षांपूर्वी ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ची क्रेझ शहर आणि परिसरात पोहोचली आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. यंदाही येथील तरुणाईने या मोहिमेसाठी पुढाकार घेतला असून केवळ स्टाईल म्हणून नव्हे, तर या संकल्पनेतून कॅन्सरग्रस्तांबरोबरच समाजातील गरजूंना मदतीचा हात दिला जातो आहे. दरम्यान, यंदाही सलून व्यावसायिकांनी आठ ते नऊ प्रकारच्या विविध स्टाइल्स तरुणाईसाठी उपलब्ध केल्या आहेत.
चार वर्षांपूर्वी सोशल मीडियावर ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ नावाने एक ग्रुप तयार झाला आणि अडीचशेहून अधिक तरुण या उपक्रमात सहभागी झाले. त्यातून पहिल्याच वर्षी तीस हजारांवर रक्कम जमा झाली. तीन कर्करोगाने त्रस्त रुग्णांना प्रत्येकी दहा हजारांची मदत दिली. दोन वर्षांपासून ही मोहीम अधिक व्यापक होत गेली. अशा ग्रुप्सची संख्याही वाढू लागली आणि त्यांनी संकलित होणाऱ्या निधीतून गरजूंना मदतीचा हात दिला जाऊ लागला आहे. यंदा पाचशेहून अधिक तरुण या मोहिमेत जोडले गेले आहेत. त्याशिवाय वैयक्तिक पातळीवरही अनेक जणांचे प्रयत्न सुरू आहेत. आमच्या उपक्रमाचे यंदाचे पाचवे वर्ष असून, आजवर वीसहून अधिक जणांना मदतीचा हात दिला. यंदाही ही संकल्पना आम्ही राबवत असून, किमान पाच गरजूंना मदत दिली जाणार आहे. त्यासाठी निधी संकलनाला प्रतिसादही चांगला मिळत असल्याचे मोहिमेचे दर्शन शहा यांनी सांगितले.
---------------
चौकट
केस, दाढी न करता
मदत अन् जागृती
आरोग्य आणि प्रोस्टेट कॅन्सर याबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने जगभरात गेली काही वर्षे ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ ही संकल्पना रुजली आहे. कर्करुग्णांवर उपचारादरम्यान केस गळण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या महिन्यात दाढी न करता त्यावर खर्च होणारे पैसे कर्करुग्णांच्या मदतीसाठी देणे, अशी ही संकल्पना आहे. मात्र, त्याचवेळी वाढलेल्या दाढी-मिशांच्या स्टाईलची संधीही यानिमित्ताने तरुणाईसाठी उपलब्ध होते आणि त्यासाठी सलून व्यावसायिकही सज्ज आहेत.