रिपाई गवई गटाचा प्रबोधन मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिपाई गवई गटाचा प्रबोधन मेळावा
रिपाई गवई गटाचा प्रबोधन मेळावा

रिपाई गवई गटाचा प्रबोधन मेळावा

sakal_logo
By

63439
कोल्हापूर : शाहू स्मारक भवनमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) आयोजित कार्यकर्ता प्रबोधन मेळाव्यात बोलताना आनंथ मांडुलीकर.

आंबेडकरी विचारच देशाला
वाचवू शकतो ः मांडुलीकर

कोल्हापूर, ता. १९ : ‘आंबेडकरी विचारच देशाला वाचवू शकतो,’ असे आनंथ मांडुलीकर यांनी सांगितले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) कोल्हापूर जिल्ह्यातर्फे रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्ता प्रबोधन मेळावा शाहू स्मारक भवनमध्ये झाला. या वेळी ते बोलत होते. महिला अध्यक्षा माधवी देशमुख मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होत्या. मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे प्रमुख उपस्थित होते.
मांडुकलीकर म्हणाले, ‘‘कार्यकर्ता हाच चळवळीचा कणा असतो. कार्यकर्त्यांनी डॉ. आंबेडकर यांची विचारधार, पक्षाच्या अजेंडा, रणनीती समजून घेऊन वाटचाल केल्यास यश नक्की मिळेल.’’
पश्‍चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष भाऊसाहेब काळे, पश्‍चिम महाराष्ट्र संघटक बबनराव शिंदे, शहर अध्यक्ष बाजीराव गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष साताप्पा कांबळे, शोभा कुमठेकर, मंगल वरपे, सुलोचना कांबळे, चंद्र कांबळे, गौतम सावंत उपस्थित होते. जिल्हा उपाध्यक्ष रंगराव कांबळे यांनी स्वागत केले. जिल्हा युवक अध्यक्ष सिद्धांत देशमुख यांनी प्रास्ताविक केले.