मुलाची ‘पाचवी’ फुटबॉल पूजनाने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलाची ‘पाचवी’ फुटबॉल पूजनाने
मुलाची ‘पाचवी’ फुटबॉल पूजनाने

मुलाची ‘पाचवी’ फुटबॉल पूजनाने

sakal_logo
By

63497

मुलाची ‘पाचवी’ फुटबॉल पूजनाने
कोल्हापूर, ता. १९ : कोल्हापूरकर फुटबॉलवर कसे प्रेम करतील, याचा नेम नाही. फिफा वर्ल्ड कपने फुटबॉल ज्वर वाढत असताना, शिवाजी पेठेतल्या संध्यामठ तरुण मंडळाच्या कार्यकर्त्याचे फुटबॉलप्रेम भलतेच चर्चेचे ठरले आहे. त्याने चक्क दुसऱ्या मुलाची पाचवी फुटबॉल पूजनाने केली आहे. अजय जगदाळे असे त्या फुटबॉलप्रेमीचे नाव आहे.
जगदाळे खासगी नोकरीत आहेत. त्यांना १४ नोव्हेंबर २०२२ ला मुलगा झाला. मुलाच्या पाचवीला त्यांनी पूजेच्या साहित्यासोबत फुटबॉल मैदानच्या प्रतिकृतीवर खेळाडूंचे छोटे कटआउटसची मांडणी केली. फुटबॉल व युरोपियन संघांचे टी शर्टस लावायला ते विसरले नाहीत. पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डोची प्रतिकृती तेथे उभी केली. जगदाळे यांच्या पहिल्या मुलग्याचे नाव अमेय. त्याचा जन्म ऑगस्ट २०१९ चा. त्याच्या पाचवीलादेखील जगदाळे कुटुंबीयांनी फुटबॉल साहित्याची मांडणी करून पूजा केली होती.