प्रवेश, परीक्षा आणि निकाला प्रक्रिया सुलभ करणार ः विद्यापीठ विकास मंच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रवेश, परीक्षा आणि निकाला प्रक्रिया सुलभ करणार ः विद्यापीठ विकास मंच
प्रवेश, परीक्षा आणि निकाला प्रक्रिया सुलभ करणार ः विद्यापीठ विकास मंच

प्रवेश, परीक्षा आणि निकाला प्रक्रिया सुलभ करणार ः विद्यापीठ विकास मंच

sakal_logo
By

प्रवेश, परीक्षा, निकालात
सुसूत्रता आणणार

विद्यापीठ विकास मंचचा संकल्प

कोल्हापूर, ता. १९ ः शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत विद्यापीठ विकास आघाडीअंतर्गत विद्यापीठ विकास मंचचे चार सदस्य निवडून आले. हे चार अधिसभा सदस्य आघाडीच्या अन्य सदस्यांबरोबर समन्वय ठेवून विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करतील. प्रवेशप्रक्रिया, परीक्षा आणि निकाल यामध्ये सुसूत्रता यावी. विद्यार्थ्यांना मनस्ताप होऊ नये, यासाठी विद्यापीठ विकास मंचचे अधिसभा सदस्य प्राधांन्याने काम करतील, अशी माहिती विद्यापीठ विकास मंचने पत्रकाद्वारे दिली.
पत्रकातील माहितीनुसार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पूर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विद्यापीठ विकास मंचची स्थापना केली. याच नावाने राज्यातील सर्व विद्यापीठात विद्यार्थीहिताचे काम केले जाते. १७ वर्षे विद्यापीठ विकास मंच आणि विद्यापीठ विकास आघाडी एकत्र येऊन विद्यापीठात काम करतात. पाच वर्षांत अधिसभेत विकासमंचच्या सदस्यांनी विविध प्रश्नांवर भूमिका मांडली. विद्यापीठ प्रशासनाने ती स्वीकारली. त्यामुळे संशोधनासाठी दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये वाढ झाली. खेळाडूंना अतिरिक्त गुण मिळाले. खेळाडू, कलाकार विद्यार्थ्यांचा विमा काढला गेला. नुकत्याच निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचचे अमित कुलकर्णी, ॲड.स्वागत परुळेकर, रतन कांबळे, डॉ. उषा पवार, लोभाजी भिसे हे पाचजण अधिसभेवर निवडून गेले. विद्यापीठातील प्रवेश सुलभ व्हावेत. परीक्षा पारदर्शक आणि संभ्रमाविना असाव्यात. निकाल बिनचूक आणि निश्चित कालावधीत लागतील; यासाठी विद्यापीठ विकासमंच पाठपुरावा करेल. नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी योग्य होण्यासाठी कटिबद्ध आहोत. असे पत्रकात म्हटले आहे.
---------------------------------------------------------------
विकास मंचचा संकल्प
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पारदर्शी अंमलासाठी कटिबद्ध.
- रोजगारभिमुख शिक्षण, शिकाऊ उमेदवारी व विकासाला गती.
-अद्यावत सुविधेद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंसाठी वातावरण रुजवणे.
- विद्यापीठात प्राध्यापक भरती करून शैक्षणिक व्यवस्था मजबूत करणे
- विद्यार्थी निवडणुका सुरू करून पारदर्शकतेसाठी प्रयत्न.
- उद्योग - शेतीपूरक नवनवीन आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध करून देणार
- स्टार्टअपसाठी कार्यक्रम घेऊन, युवकांना उद्योग व्यवसायात संधीसाठी प्रयत्न
--------------------------