गोकुळ बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोकुळ बातमी
गोकुळ बातमी

गोकुळ बातमी

sakal_logo
By

फोटो63472

‘गोकुळ’मुळे सहकार चळवळीला दिशा

अनिल कारंजकर ः सहकार सप्ताहानिमित्त व्याख्यान
.............
कोल्‍हापूर, ता. १९ ः सहकार चळवळीला दिशा देण्‍याचे काम ‘गोकुळ’ने केले आहे, असे प्रतिपादन पुण्याच्या वैकुंठ मेहता इन्स्टिट्यूटचे सेवानिवृत्त अधिष्ठाता अनिल कारंजकर यांनी केले.
‘गोकुळ’मध्ये ६९ व्‍या अखिल भारतीय सहकार सप्‍ताहनिमित्‍त आयोजित व्याखानात ते बोलत होते. ते म्‍हणाले,‘‘गोकुळने सहकाराच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायात केलेली नेत्रदीपक प्रगती कौतुकास्पद असून महिला, युवकांना दुग्ध व्यावसायाच्या माध्यमातून व्यवसायाची संधी संघाने उपलब्ध करून दिली आहे.’’
दरवर्षीप्रमाणे ‘गोकुळ’ तर्फे ताराबाई पार्क कार्यालयाच्‍या आवारात सहकार सप्‍ताहानिमित्तत व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे दीपप्रज्‍वलन व माजी पंतप्रधान इंदिरा गाधी यांच्‍या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले. सहकार बोर्डाचे एस. पी. जाधव यांनी सहकार गीत सादर केले. कार्बन क्रेडिट बायोगॅस योजनेची माहिती सिस्‍टीमा बायोगॅस पुणे या कंपनीचे प्रतिनिधी खुरर्म मुजावर यांनी दिली. सूत्रसंचालन एम. पी. पाटील यांनी केले.
कार्यक्रमाला संचालक अरुण डोंगळे, नंदकुमार ढेंगे, प्रकाश पाटील, चेतन नरके, बयाजी शेळके, संकलन व्‍यवस्‍थापक एस. व्‍ही. तुरंबेकर, महिला नेतृत्‍व विकास अधिकारी नीता कामत आदी उपस्थित होते. आभार संचालक शशिकांत पाटील यांनी मानले.
..........