इचल : जिल्हाधिकारी बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : जिल्हाधिकारी बैठक
इचल : जिल्हाधिकारी बैठक

इचल : जिल्हाधिकारी बैठक

sakal_logo
By

६३४७४
कोल्हापूर ः जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत चर्चा करताना खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, तानाजी पोवार आदी.
............

गौण खनिज व्‍यवसायास
जिल्ह्यात परवानगी
इचलकरंजी, ता. १९ ः वडार समाजाच्या उपजीविकेसाठी कुटुंबाला २०० ब्रास रॉयल्टी माफ करणे, स्टोन क्रशर व्यवसायातील रॉयल्टी भरून घेऊन परवाना देणे, असे गौण खनिज व्यवसायाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आले. खासदार धैर्यशील माने व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत संबंधित घटकांची बैठक झाली. याबाबतची माहिती ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेचे प्रदेश सरचिटणीस तानाजी पोवार यांनी दिली. या निर्णयामुळे तीन वर्षे बंद असलेल्या गौण खनिज व्यवसाय व मोलमजुरी करणाऱ्या वडार समाजाच्या उपजीविकेचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील गौण खनिज उत्खनन व्यवसाय सुरू करण्याबाबत मंत्रालयात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. या प्रश्नाबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगत जिल्हाधिकारी स्तरावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.
बैठकीत चर्चेअंती गौण खनिज उत्खनन व्यवसाय व स्टोन क्रशर व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. बैठकीस सतीश मलमे, रमेश कलकुटगी, परसू धनवडे, सचिन डोंगरे, आकाश शिंगाडे, अभिजित पोवार, संजय सावंत, अबू डांगे, अनुप चौगुले, नागेश गाडीवडर, सखाराम नलवडे, शिवाजी शिंगाडे, संजय नाईक, सुरेश पोवार, विनोद शिंगाडे, सागर पोवार उपस्थित होते.