न्यू कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्यू कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद
न्यू कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद

न्यू कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद

sakal_logo
By

फोटो : 63483
कोल्हापूर : न्यू कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के. शेजारी डॉ. रमेश जाधव, बी. जी. बोराडे, के. जी. पाटील, डी. जी. किल्लेदार, प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, डॉ. अर्चना कांबळे.

......

राष्ट्रउभारणीत राजर्षी शाहूंचे
उद्यमशील कार्य देदीप्यमान

डॉ. डी. टी. शिर्केः न्यू कॉलेजमधील आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ : ‘राजर्षी शाहू महाराजांच्या कृतिशील कार्यामध्ये स्वातंत्र्य, समानता, बंधूभाव, मानवता या मूल्यांचा पुरस्कार करणारी प्रागतिक विचारधारा आहे. लोककल्याणकारी प्रजाहितौषी ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ ही तत्त्वप्रणाली आहे. त्यांच्या पुरोगामी विचारधारेत सामाजिक बांधिलकी आणि ऐक्याचे सुराज्य उभा करण्याचे सामर्थ्य होते,’ असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले.

न्यू कॉलेजमध्ये आयोजित ‘राजर्षी शाहू छत्रपती : दृष्टिकोन, योगदान व समकालीन प्रस्तुतता’ यावर दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप झाला. यावेळी ते बोलत होते.

डॉ. शिर्के म्हणाले, ‘‘शिवाजी विद्यापीठाची वाटचाल ही राजर्षी शाहूंच्या विचारांचा वसा, वारसा घेऊन होत आहे. राष्ट्रउभारणीत राजर्षी शाहूंचे उद्यमशील कार्य देदीप्यमान आहे. पुरोगामी महाराष्ट्राचे ते ऐतिहासिक संचित आहे. नव्या पिढीला निश्चितच ते ऊर्जा देणारे आहे. भारतीय लोकशाही समाजव्यवस्थेमध्ये आदर्शवत आहे.’’

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव म्हणाले, ‘‘राजर्षी शाहू महराजांनी कला, क्रीडा, शिक्षण, साहित्य, व्यापार, उद्योग अशा जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये योगदान दिले. शाहूंच्या विचारांचा जागर होण्यासाठी अशाप्रकारच्या परिषदांची आवश्यकता आहे.’’

प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी स्वागत केले. यावेळी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष बी. जी. बोराडे, चेअरमन के. जी. पाटील, उपाध्यक्ष डी. जी. किल्लेदार, संचालक आर. डी. पाटील, श्रीमती सविता पाटील, वाय. एस. चव्हाण, संस्थेचे आजीव सेवक आणि उपप्राचार्य डॉ. ए. एम. शेख, विविध शाखाप्रमुख, प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. परिषदेच्या समन्वयक डॉ. अर्चना कांबळे यांनी आभार मानले.