ग्रामपंचायत निवडणुका ताकदीने लढवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामपंचायत निवडणुका ताकदीने लढवणार
ग्रामपंचायत निवडणुका ताकदीने लढवणार

ग्रामपंचायत निवडणुका ताकदीने लढवणार

sakal_logo
By

63501
------------------------------
ग्रामपंचायत निवडणुका ताकदीने लढवणार
भाजपची संघटनात्मक बैठक : सरपंचपदाच्या व्यूहरचनेवर झाली चर्चा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २० : तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ताकदीने लढविण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला आहे. गडहिंग्लज तालुक्यातील पदाधिकारी शक्ती केंद्रप्रमुखांची संघटनात्मक बैठक झाली. यात हा निर्णय घेण्यात आला. जास्तीत जास्त गावात भारतीय जनता पार्टीचे सरपंच निवडून आणण्याच्या व्यूहरचनेवर चर्चा झाली. माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पाटील, माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. हॉटेल मल्हारच्या सभागृहात ही बैठक झाली.
विस्तारक संदीप नाथबुवा यांनी तालुक्याचा आढावा मांडला. तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अनिता चौगुले, विजय मगदूम, मार्तंड जरळी, बसवराज कंकणवाडी, एल. टी. नवलाज यांनी मते मांडली. शिवाजी पाटील, भरमू पाटील यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. सर्व गावात ताकदीने निवडणूक लढवावी. शक्य तेथे आघाडीच्या माध्यमातून मतदारांसमोर जावे. अधिकाधिक गावात भाजपचा सरपंच निवडून आणणे आदी मुद्यांवर बैठकीत चर्चा झाली.
संतोष तेली, सुभाष चोथे, बी. एस. पाटील, प्रीतम कापसे, अविनाश दुध्यागोळ, बसवराज आरबोळे, प्रकाश पाटील, अजित जामदार, संतोष कल्याण, प्रशांत पाटील, दत्तात्रय नाईक, अशिष साखरे, आनंदा कुराडे, संजय कांबळे, भिकाजी पाटील, संदीप रोटे, संजय कुलकर्णी, आजरा तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार, चंदगड तालुकाध्यक्ष नामदेव पाटील आदी उपस्थित होते. शहराध्यक्ष राजेंद्र तारळे यांनी स्वागत केले.