पालेभाज्या महागल्या, कोंथिबिर घसरली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालेभाज्या महागल्या, कोंथिबिर घसरली
पालेभाज्या महागल्या, कोंथिबिर घसरली

पालेभाज्या महागल्या, कोंथिबिर घसरली

sakal_logo
By

63509
-------

पालेभाज्या महागल्या, कोंथिबिर घसरली
---
पेरूची आवक कायम; लसणाचा भाव वधारला, स्थानिक बटाट्याला मागणी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २० : येथील भाजी मंडईत पालेभाज्यांचे भाव वधारले आहेत. तुलनेत अधिक आवकेने कोंथिबीर घसरली. स्थानिक बटाट्याला मागणी वाढली आहे. गेले काही महिने घसरलेला लसणाचा दर हळूहळू सावरू लागला. कोबी, टोमॅटो यांचा दर उतरलेलाच आहे. फळ बाजारात पेरूची वाढलेली आवक कायम आहे. दोन महिन्यांपासून जनावरांचा बाजार अद्याप बंदच आहे.
भाजीमंडईत आठ दिवसांपासून कोथिंबिरीची लक्षणीय आवक आहे. त्यामुळे पेंढीचा दर गडगडला. घाऊक बाजारात २०० ते ३०० रुपये असा दर झाला आहे. किरकोळ बाजारात सकाळच्या सत्रात केवळ तीन ते पाच रुपये असा दर होता. तुलनेत पालेभाज्यांची अद्याप पुरेशी आवक नाही. त्यामुळे पेंढीचा दहा रुपये असाच दर आहे. उसाच्या लावणीतील पालेभाज्या पंधरवड्यात मंडईत आल्या की दर कमी होतील, अशी अपेक्षा विक्रेत्यांनी व्यक्त केली. लसणाचा क्विंटलमागे ५००, तर किलोमागे पाच ते दहा रुपयांनी दर वाढला. स्थानिक बेळगावी बटाट्याला मागणी चांगली आहे. किलोचा २० ते ४० रुपये दर आहे.
कोबी, टोमॅटोचा दर अधिक आवकेने उतरलेलाच आहेत. बिन्स, गवार, वांगी यांचे दर अधिक आहेत. फळ बाजारात पेरूची अधिक आहे. दरवर्षी पावसाळ्यात पेरूची आवक सुरू होते. ऑक्टोबरनंतर हा हंगाम कमी होतो. पण, यंदा परतीचा मोठा पाऊस झाल्याने अद्याप पेरूची वाढलेली आवक टिकून असल्याचे विक्रेते इमामहुसेन पानवाले यांनी सांगितले. किलोचा दर ८० ते १०० रुपये आहे. सफरचंद १००, संत्री, मोसंबी, डाळिंब ८० रुपये किलो आहेत. लम्पी रोगाचा प्रादुर्भाव कमी होऊनही बाजार समितीच्या आवारात भरणारा जनावरांचा बाजार अद्याप बंद आहे. दोन महिन्यांपासून बाजार बंद असल्याने पशुपालकांत नाराजीचा सूर आहे.
------------------------
चिकन, मासे तेजीत
पंधरवड्यापासून मटण मार्केटमध्ये तेजीचे चित्र आहे. चिकन, मासे यांना मागणी वाढल्याने दर वाढले. परिणामी, चिकनचा दर १७०, तर विविध प्रकारचे मासे १८० ते ८०० रुपये किलो आहेत. नदी, तलावाच्या माशांपेक्षा समुद्री माशांची आवक अधिक आहे. मटण ६०० ते ६५० रुपये किलो आहे.