ए. डी. शिंदे पॉलिटेक्निकमध्ये ''प्रज्ञान-२२'' स्पर्धेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ए. डी. शिंदे पॉलिटेक्निकमध्ये ''प्रज्ञान-२२'' स्पर्धेचे आयोजन
ए. डी. शिंदे पॉलिटेक्निकमध्ये ''प्रज्ञान-२२'' स्पर्धेचे आयोजन

ए. डी. शिंदे पॉलिटेक्निकमध्ये ''प्रज्ञान-२२'' स्पर्धेचे आयोजन

sakal_logo
By

ए. डी. शिंदे पॉलिटेक्निकमध्ये
‘प्रज्ञान-२२’ स्पर्धेचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २० : भडगाव येथील डॉ. ए. डी. शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि आय. एस. टी. ई. नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने प्रज्ञान-२०२२ या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन शुक्रवारपासून (ता. २५ ते २७) सुरू केले आहे.
स्पर्धेच्या उद्‍घाटनप्रसंगी पुणे टेक्निकल मंडळाचे विभागीय सचिव शाहीद उस्मानी आणि पुण्याच्या विभागीय तंत्रशिक्षण संचलनालयाचे सहायक संचालक एम. आर. जाधव पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेमध्ये आठवीपासून डिप्लोमापर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शन, प्रश्नमंजूषा, टी-शर्ट प्रिंटिंग, रोबो रेसिंग व विविध टेक्निकल स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्राचार्य ए. एस. शेळके यांनी केले आहे.
संस्थेने स्पर्धांसाठी विविध गटानुसार एकूण ५० हजारांच्या आकर्षक बक्षिसांची योजना आखली आहे. तसेच स्पर्धेसाठी भागातील विविध कंपन्यांनी प्रायोजकत्वही देऊ केले आहे. स्पर्धेतून विद्यार्थ्यांना त्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी एक संधी उपलब्ध होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे व सचिव प्रा. स्वाती महेश कोरी यांचे मार्गदर्शनाने स्पर्धेचे नियोजन सुरू केले आहे.