कालकुंद्रीतील मृत्यू प्रकरणी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कालकुंद्रीतील मृत्यू प्रकरणी
उपमुख्यमंत्र्यांना निवेदन
कालकुंद्रीतील मृत्यू प्रकरणी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

कालकुंद्रीतील मृत्यू प्रकरणी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

sakal_logo
By

कालकुंद्रीतील मृत्यू प्रकरणी
उपमुख्यमंत्र्यांना निवेदन
कोवाड, ता. २१ ःमहिन्याभरापूर्वी आपल्या आईचा मृतदेह घराच्या शेजारील शेतात आढळला. हा नैसर्गिक मृत्यू नसल्याची फिर्याद चंदगड पोलिसांत दिली आहे. पोलिस डॉक्टरांच्या शल्यचिकित्सा आहवालाचे कारण पुढे करत चालढकल करत आहेत. याची चौकशी व्हावी, अशी मागणी कालकुंद्री (ता. चंदगड) येथील मयत नंदा नामदेव जोशी यांची मुले भरमू जोशी व प्रकाश जोशी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून केली.
निवेदनात म्हटले आहे, १९ ऑक्टोबर रोजी नंदा जोशी यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात आहे. याचा उलगडा अजूनही झालेला नाही. आरोग्य केंद्रातील शल्यचिकित्सा अहवालावरून हा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असले तरी हा खून झाल्याचा संशय आहे. तशी फिर्याद दिली आहे. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याने तत्काळ याची चौकशी होऊन न्याय मिळावा.