डॉ. उमाकांत पाटील यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. उमाकांत पाटील यांची निवड
डॉ. उमाकांत पाटील यांची निवड

डॉ. उमाकांत पाटील यांची निवड

sakal_logo
By

63598

‘डी. वाय.’च्या डॉ. उमाकांत पाटील
यांची ‘ब्रेन पूल फेलो’ म्हणून निवड

कोल्हापूर, ता. २० ः डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे संशोधक व प्रा. डॉ. उमाकांत पाटील यांची कोरियन राष्ट्रीय संशोधन फाउंडेशनकडून ‘ब्रेन पूल फेलो’ म्हणून निवड झाली आहे. या फेलोशिपच्या माध्यमातून त्यांना दक्षिण कोरियातील योन्सेई युनिव्हर्सिटीमध्ये ऊर्जा साठवणुकीवर संशोधन करण्याची संधी मिळाली आहे. या संशोधनातून ऊर्जा साठवणुकीसाठी लागणारे अधिक क्षमतेचे नवीन घटक बनवण्यात येतील.
डॉ. पाटील हे डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च’मध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठातून त्यांनी प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिकशास्त्र (पदार्थविज्ञान) विषयामध्ये पीएच. डी. केली. गेली १३ वर्षे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उच्चस्तरीय संशोधन करत असताना आतापर्यंत त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर १०० शोधनिबंध, १० पेटंट प्रसिद्ध केले आहेत. या निवडीसाठी संस्थाध्यक्ष व कुलपती डॉ. संजय पाटील, उपाध्यक्ष व आमदार सतेज पाटील, विश्वस्त व आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, रजिस्ट्रार डॉ. व्ही. व्ही. भोसले, वित्त अधिकारी श्रीधर नारायण स्वामी यांनी शुभेच्छा दिल्या.