अपघातामध्ये महिलेचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघातामध्ये महिलेचा मृत्यू
अपघातामध्ये महिलेचा मृत्यू

अपघातामध्ये महिलेचा मृत्यू

sakal_logo
By

फोटो - 63630

एसटी बसच्या
धडकेत महिलेचा मृत्यू
कोल्हापूर, ता. २० ः मुक्त सैनिक चौकात एसटी बसने धडक दिल्याने आज एका महिलेचा मृत्यू झाला. नकुशी बाबूराव हुंबे (वय ५७, रा. साळोखे कॉलनी, कदमवाडी) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हुंबे या नवजात बालकांना अंघोळ घालण्याचे काम करतात. त्या आज सकाळी साडेनऊच्या सुमारास मुक्त सैनिक वसाहतीच्या चौकातून रुईकर कॉलनी येथील एका घरी कामानिमित्त निघाल्या होत्या. त्यावेळी एसटीची धडक लागल्याने त्या पडल्या. या वेळी त्यांच्या डोक्याला मार लागला. चालक सागर गुरव यांनी त्यांना तातडीने रिक्षातून ‘सीपीआर’मध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर चालक गुरव पोलिस ठाण्यात हजर झाले.