होमिओपॅथिकतर्फे चर्चासत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

होमिओपॅथिकतर्फे चर्चासत्र
होमिओपॅथिकतर्फे चर्चासत्र

होमिओपॅथिकतर्फे चर्चासत्र

sakal_logo
By

63657
कोल्हापूर : जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर संघटना, वेणूताई यशवंतराव चव्हाण होमिओपॅथिक कॉलेजतर्फे ‘देवदूत’ कार्यक्रमात माहिती देताना डॉ. राजेंद्र जगताप.


‘ॲक्युट मेडिकल इमर्जन्सी मॅनेजमेंट’वर चर्चासत्र
कोल्हापूर, ता. २० : प्री हॉस्पिटल इमर्जन्सी मेडिकल केअर हा कोर्स लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती पुणे येथील डॉ. राजेंद्र जगताप यांनी दिली.
जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर संघटना आणि वेणूताई यशवंतराव चव्हाण होमिओपॅथिक कॉलेजतर्फे ‘देवदूत’ कार्यक्रम शाहू स्मारक भवन येथे झाला. ‘ॲक्युट मेडिकल इमर्जन्सी मॅनेजमेंट’ यावर चर्चासत्र झाले.
डॉ. जगताप यांनी सर्पदंश, श्वासनलिकेत वस्तू अडकून श्वास गुदमरणे, इलेक्ट्रिक शॉक लागणे, पाण्यामध्ये बुडलेल्या व्यक्तीला नेमकी कशी मदत करायची यावरील प्रात्यक्षिक दाखविले.
डॉ. अरुण भस्मे यांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करू नये, हे माहीत असणे गरजेचे असल्याचे सांगितले.
‘सनराइज’चे अध्यक्ष संदीप चव्हाण, डॉ. जयवंत पाटील, डॉ. वीरधवल मोरे, डॉ. महेश पाटील, डॉ. संदीप पाटील, डॉ. गिरीश कोरे, डॉ. स्नेहल पाटील, डॉ. विशाल सावंत, डॉ. सागर माने, डॉ. प्राची महाजन, डॉ. मोनाली सुभेदार, डॉ. मनोज भोपळे आणि संघटनेतील डॉक्टर, विविध भागांतून आलेले नागरिक उपस्थित होते.
डॉ. नितीन बेलनेकर यांनी स्वागत केले. अध्यक्ष डॉ. श्यामप्रसाद पावसे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रिया दंडगे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. श्रीकांत लंगडे यांनी आभार मानले.