आजरा ः पोलीस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः पोलीस वृत्त
आजरा ः पोलीस वृत्त

आजरा ः पोलीस वृत्त

sakal_logo
By

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी
पतीविरोधात गुन्हा
आजरा ः देवर्डे (ता. आजरा) येथील दीपा दिगंबर पाटील या विवाहितेचा मृतदेह गुरुवार (ता.१७) विहिरीत मिळाला होता. तिच्या माहेरच्यांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केला होता. माहेरकडील नातेवाइकांनी आक्रमक होत मृतदेह ताब्यात देण्यास मज्जाव केला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर दीपा यांच्यावर अंत्यसंस्कार केले. दीपा यांचा भाऊ अरुण निंगाप्पा गुरव रा. सुपे (ता. चंदगड) यांनी बहिणीच्या पतीने मानसिक छळ केल्याची तक्रार आजरा पोलिसांत दिली आहे. यावरून पती दिगंबर मारुती पाटील याच्याविरोधात आजरा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे अधिक तपास करीत आहेत.