स्वातंत्र्यलढ्यात महिलांचे योगदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वातंत्र्यलढ्यात महिलांचे योगदान
स्वातंत्र्यलढ्यात महिलांचे योगदान

स्वातंत्र्यलढ्यात महिलांचे योगदान

sakal_logo
By

63671
...
महिला अत्याचारांविरोधात तरुणींनी पुढे यावे

सरलाताई पाटील ः गांधी विचार मंचतर्फे परिसंवादाचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० ः ‘स्वातंत्र्यचळवळीत महिलांचे योगदान मोठे आहे. कोल्हापुरातील जयाताई हाविरे यांनी गरोदर असतानाही विल्सनच्या पुतळ्याला डांबर फासले होते. त्यांचे नाव लिशां हॉटेल चौकाला द्यावे, यासाठी कोल्हापुरात चळवळ उभी राहिली. अशा चळवळींमध्ये तरुणींनी पुढे आले पाहिजे. अन्यायाच्या विरोधात तरुणींनी आवाज उठविला, तर सध्याची असुरक्षित परिस्थिती निर्माण होणार नाही’, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सदस्या सरलाताई पाटील यांनी केले. मोहनदास करमचंद गांधी विचारमंचतर्फे सामाजिक कार्यकर्त्या भारती पोवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्रातील स्त्रियांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. या वेळी त्या बोलत होत्या.
चित्रदुर्ग मठात झालेल्या परिसंवादात कोल्हापुरातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी सहभाग घेतला. माजी उपमहापौर सुलोचना नायकवडी म्हणाल्या, ‘‘कोणताही विचार संघटित होऊन पुढे नेणे गरजेचे असते. महिलांवरील अत्याचाराच्या सध्याच्या घटना पाहिल्या की मन अस्वस्थ होते.’ ‘एकटी’ संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले म्हणाल्या, ‘‘महिलांनी ताकदीने संघटित होऊन त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे.’
इतिहास संशोधक देविकाराणी पाटील यांनी कोल्हापूर हे तीर्थक्षेत्र न होता ‘शाहूक्षेत्र’ होणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर, सुमन पाटील, भारती पाटील, तनुजा शिपुरकर, अनुराधा मेहता, गीता हसूरकर, दीपा शिपूरकर, राणी पाटील, स्वप्नजा घाटगे, खुर्शीद लाटकर, पद्मिनी माने, वैशाली महाडिक, शुभांगी साखरे यांनी विचार मांडले.
ं‘अंनिस’च्या सीमा पाटील यांनी कोल्हापुरातील सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांची ओळख करून दिली. प्रा. शशिकला सरगर यांनी प्रस्तावना केली. यावेळी प्रा. टी. के. सरगर, अभिषेक मिठारी, प्रभाकर पाटील, सुभाष पाटील आदी उपस्थित होते. अक्षय जहागीरदार यांनी सूत्रसंचालन केले.