अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अटक
अटक

अटक

sakal_logo
By

‘त्या’ शिक्षकाला ‘पोक्सो’खाली अटक

विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन भोवले ः पालकांनीच दिली तक्रार

आपटी, ता. २० ः अल्पवयीन विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन करणाऱ्या संशयित शिक्षकाला पोलिसांनी ‘पोक्सो’ कायद्याखाली अटक केली. पालकांनीच संबंधित शिक्षकाविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
संशयित शिक्षक हा दिव्यांग आहे. वर्गात आल्यानंतर तो अभ्यासाचे निमित्त काढून विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन करीत होता. हा धक्कादायक प्रकार काल (शनिवारी) उघडकीस आला होता. याप्रकरणी रात्रीच पालकांनी शिक्षकाविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून पोलिसांनी लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी संशयिताला रात्री उशिरा अटक केली. आज (रविवारी) त्याला पन्हाळा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
......
चंदगडमध्ये हजर
करून घेण्यास विरोध

चंदगड ः विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन करणाऱ्या संशयित शिक्षकाची शिक्षण विभागाने चंदगड तालुक्यात तडकाफडकी बदली केली. याबाबत माहिती समजताच चंदगड तालुक्यांतून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. या शिक्षकाला कोणत्याही परिस्थितीत हजर करून घ्यायचे नाही, असा निर्णय घेण्यात आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी आपली विरोधातील मते व्यक्त केली. शिक्षकांची रिक्त पदे भरणे गरजेचे असताना जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग त्याकडे दुर्लक्ष करतो आणि गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकांना गरज नसताना इकडे का पाठवतो, असा सूर व्यक्त झाला. अशा शिक्षकाला हजर करून घ्यायचे नाही, अशा सार्वत्रिक प्रतिक्रिया उमटल्या. शिक्षण विभागाने तसा निर्णय घेतला तर आंदोलन करू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते ॲड. संतोष मळवीकर यांनी दिला आहे.