अंडी उबवणी केंद्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंडी उबवणी केंद्र
अंडी उबवणी केंद्र

अंडी उबवणी केंद्र

sakal_logo
By

दीड लाख पिल्ली, सव्वादोन लाख अंडी
मध्यवर्ती उबवणी केंद्राचे वर्षात २५ लाखांवर उत्पन्न; दरवर्षी पोल्ट्रीचे प्रशिक्षणही

कोल्हापूर, ता. २१ ः पुणे विभागातील पुण्यानंतर कोल्हापुरात असलेल्या मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रातून कोरोनाच्या काळानंतरही दीड लाखांवर पिल्लांचे उत्पादन, तर सव्वादोन लाखांवर अंडी उत्पादन झाले. यातून २५ लाखांवर उत्पन्न मिळाले असून, यंदा गिरीराज जातीचे तीन हजार पक्षी घेतले आहेत. जानेवारीनंतर अंडी व पिल्ली उपलब्ध होणार आहेत.
शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून ना नफा-ना तोटा तत्त्वावर हे केंद्र चालवण्यात येते. सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्गमधील व्यावसायिकांना पिल्ली व अंड्याचा पुरवठा केला जातो. येथून एकदिवसीय पिल्ली, उबवणीची अंडी, खाण्यासाठीची अंडी, तसेच पोल्ट्री खत दिले जाते. हे मूळ काम असले तरी स्वयंरोजगाराची संधी निर्माण करणाऱ्यांना पोल्ट्रीचे एक महिन्याचे प्रशिक्षणही दिले जाते. वर्षभरात ३०० पर्यंत लाभार्थी त्याचा लाभ घेतात. कोरोना काळातही ही सर्व कामे सुरू होती. त्यापूर्वी उत्पादित होत असलेली पिल्ली, अंडी तसेच पोल्ट्रीखतातून साठ लाखांवर उत्पन्न मिळायचे. कोरोनानंतरच्या पहिल्या वर्षात २१-२२ मध्ये २५ लाखांवर उत्पन्‍न मिळाले आहे.

चौकट
केंद्रातील दर
* एकदिवसीय पिल्ले - २० रुपये
* उबवणीची अंडी- ११ रुपये
* खाण्याची अंडी- ५ रुपये
* पोल्ट्री खत- १५०० रुपये टन
.....
चौकट
अशी आहे यंत्रणा
* क्षेत्र- ९ हेक्टर
* शेड- ६ लेअर
* पिल्ली निर्मिती विभाग- १
* सहायक आयुक्त- १
* पशुधन विकास अधिकारी- २
* सहायक पशुधन विकास अधिकारी- २
* वरिष्ठ लिपिक, परिचर व वॉचमन- १

याशिवाय...
* कार्यालय
* कर्मचारी निवासस्थान
* पशुसंवर्धन अंतर्गत येणारी कृत्रिम रेतन केंद्र
* जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय

कोट
ना नफा-ना तोटा तत्त्वावर अंडी व पिल्ली दिली जात असल्याने अनेकजण येथून खरेदी करत असतात. चांगली उलाढाल होत असते. तसेच प्रशिक्षणालाही दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- डॉ. पी. एम. नाईक, प्रभारी सहायक आयुक्त