काँग्रेसतर्फे कोश्यारींविरोधात निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेसतर्फे कोश्यारींविरोधात निदर्शने
काँग्रेसतर्फे कोश्यारींविरोधात निदर्शने

काँग्रेसतर्फे कोश्यारींविरोधात निदर्शने

sakal_logo
By

63704
-----------
काँग्रेसतर्फे कोश्यारींविरोधात निदर्शने

इचलकरंजी, ता. २१ : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या निषेधार्थ के. एल. मलाबादे चौकात इचलकरंजी शहर काँग्रेसतर्फे जोडामारो आंदोलन केले. आंदोलकांनी राज्यपाल कोश्यारी व भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांचाविरोधात निदर्शने केली.
आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावचकर यांनी, कोश्यारी हे राज्यात राज्यपाल झाल्यापासून सातत्याने वादग्रस्त विधाने करून छत्रपतींचा अवमान करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही बाब राज्यपालपदास शोभणारी नाही. कोश्यारींची राज्यातून केंद्र शासनाने उचलबांगडी करावी. तसेच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी केली. शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद खुडे यांनी भगतसिंग कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांचा निषेध करून मनोगत व्यक्त केले. आंदोलनात युवराज शिंगाडे, शशिकांत देसाई, डॉ. विलास खिलारे, रविराज पाटील, हारुण खलिफा, दिलीप पाटील, भूषण शहा, किशोर जोशी, प्रवीण फगरे, शैलेंद्र गजरे, समीर शिरगावे, सचिन साठे, प्रमोद नेजे, रवी वासुदेव, ओंकार आवळकर, तोसीफ लाटकर आदी सहभागी झाले होते.